आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बार्शीटाकळी पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा उत्साहात

बार्शीटाकळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा संपन्न झाली. सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या निमीत्ताने बार्शीटाकळी शहरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.अप्पर पोलीस अधिकारी मोनिका राऊत यांनी सर्व मंडळाच्या सदस्यांना, उत्सवादरम्यान घ्यावयाची खबरदारी ही जबाबदारीने पार पाडावी, म्हणजेच शहरातील शांतता व सुव्यवस्था बाधित होणार नाही. या शांतता सभेला उपस्थित सर्वांचीच शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी, या विषयाला धरून भाषणे झाली.

आजच्या सभेला नगर अध्यक्ष महेफुज खान प्रमुख पाहुणे होते, महिला दक्षता समितीच्या पुष्पा रत्नपारखी, अल्का जाधव, विनायक टेकाडे, नगरसेवक सुनिल शिरसाट, सैयद जहांगीर, अन्सार खॉन, श्रावण भातखडे, रमेश वाटमारे, मासुम, नसीम मास्टर, संतोष राऊत, योगेश कोंदनकर, गोपाल वाट, गोविंदा राऊत, प्रवीण गोल्डे, सादीक लिडर, रहिम, भोला इनामदार यांच्यासह सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक ठाणेदार संजय सोळंके तर आभार किशोर पिंजरकर यांनी मानले. सूत्रसंचालन अनंत केदारे यांनी केले. ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस कर्मचाऱ्यांनी या सभेचे आयोजन केले होते.

बातम्या आणखी आहेत...