आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक सद्भावाचे आवाहन:सर्वधर्म समभावाचा संदेश देत निघाला शांतता मार्च; वंचित आघाडीचा पुढाकार

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन व अभिवादन

भोंग्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे १ मे महाराष्ट्र दिनी शांतता मार्च काढण्यात आला आहे. शहरातील विवध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन व अभिवादन करण्यात आले. शातंता मार्चच्या माध्यमातून धार्मिक सदभावाचे आवाहन करण्यात आले.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात न्यायालयाने निर्देशानुसार मशदिींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट असल्याची भिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गत आठवठ्यात व्यक्त केली होती. या पृष्ठभूमीवर राज्यात शांतता राहावी, यासाठी १ मे रोजी ठिकठिकाणी शांती मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी अकोल्यात केली होती. दरम्यान रविवारी महानगरात दुचाकीवरून शांतता मार्च काढण्यात आला. या शांतता मार्चमध्ये राजेंद्र पातोडे, डॉ धैर्यवर्धन पुंडकर, बालमुकंद भिरड,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बुलढाणा प्रभारी प्रदीप वानखडे, गजानन गवई, प्रभा सिरसाट, सावित्री राठोड, आकाश सिसाट,नीलेश देव,किण बोराखडे,दीपक गवई,अॅड संतोष रहाटे,दिनकरराव खंडारे, कलीम खान पठाण, शंकरराव इंगळे, सचिन शिराळे,संजय नाईक, सुशांत बोर्डे,पराग गवई, सम्राट सुरवाडे, विनोद देशमुख, संगीता अढाउ, ,बुध्दरत्न इंगोले, जीवन डिगे, जीवन उपर्वट, किशोर जामनिक,मोहन तायडे आदी सहभागी झाले होते.

कुठे पूजन तर कुठे अभिवादन
१)जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक एकोपा कायम राहावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शांतता मार्चला जुने शहरातील श्री राजेश्वर मंदिरापासून प्रारंभ करण्यात अला. श्री राज राजेश्वरांची पूजा करण्यात आली.
२) जुने शहरातील काळा मारोती मंदिर येथे हनुमान चालीसा पठण करीत कार्यकर्त्यांनी पूजा केली.
३) जामा मस्जदि येथे मुस्लिम बांधवांनी वंचितचे नेते-कार्यकर्त्यांचे पुष्पहाराने स्वागत केले.
४) कार्यकर्त्यांनी राम मंदिर येथे पूजन केले. तसेच जैन मंदिरातही पूजन करण्यात आले.
५) शांतता मार्च रेल्वे स्टेशन जवळील गुरुद्वारा येथे पोहोचले. याठिकाणी अभिवादन करण्यात आले. गुरुद्वारा समिती ने “शांतता मार्च” चे स्वागत केले.
६) मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या चर्चमध्ये फादरतर्फे स्वागत करण्यात आले. तसेच शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली.
७) अशोक वाटीका येथे तथागत भगवान गौतम बुद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदर्शांचे पूजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...