आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • People Suffer Because Of Loose Animals; Kondwara, However, Is 'confined'; In Spite Of Being Injured, The Disinterest Did Not End \ Marathi News

दुर्लक्ष:मोकाट जनावरांमुळे लोक त्रस्त; कोंडवाडा मात्र अनास्थेत ‘बंदिस्त’ ; जखमी होऊनही अनास्था संपेना

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोकाट वळूंची संख्या वाढली आहे. हे वळू हल्ला करीत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, मोठी जनावरे पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे उपाय योजना नसल्याने मोकाट वळूच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे. त्याच बरोबर सुरळीत वाहतूक, मोकाट जनावरांपासून बचाव आदी जबाबदारीही महापालिकेचीच आहे. या हेतूनेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने कोंडवाडा विभाग सुरू करण्यात आला आहे. कोंडवाडा विभागाच्या वतीने मोकाट श्वान, मोकाट जनावरे यांच्यावर कारवाई करण्यात येते. पूर्वी मोकाट श्वानांना पकडून वाहनातून शहराबाहेर सोडले जात होते. मात्र यावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोंडवाडा विभागावरील ताण कमी झाला आहे. मात्र मोकाट जनावरे पकडण्याची जबाबदारी कोंडवाडा विभागाची आहे. तूर्तास शहरात गाय, वासरु, गोरा, बकरी, गाढव, वळू आदींची संख्या वाढली आहे. यात वळू वगळता अन्य प्राणी हे शहरातील नागरिकांच्या मालकीची आहेत. मात्र दिवसभर हे जनावरे मोकाटपणे शहरातील प्रमुख मार्ग, चौक एवढेच नव्हे तर गल्ली- बोळीतही ठाण मांडून बसलेले असतात.

यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तर वळू नागरिकांसाठी सर्वाधिक त्रासदायी ठरले आहेत. अनेकदा मुख्य मार्गावर दोन वळूंमध्ये टक्कर पाहायला मिळते. यामुळे वाहतूक अस्ताव्यस्त होते. त्याच बरोबर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वळूला छेडलेले नसताना वळू उभ्या नागरिकाला शिंगाने फेकून देण्याच्या घटना शहरात घडत आहेत. यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी खदान भागात मुल्लांनी चौकात एसटी बस चालक शेख रहेमान शेख रफी हे वळूने केलेेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने पुन्हा मोकाट जनावरांचा विषय ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या वतीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम योग्य पद्धतीने राबवली जात नसल्याने मोकाट जनावरांना पकडणार काेण? अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

वेतनावर वर्षाकाठी ३६ लाख खर्च
महापालिकेच्या कोंडवाडा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी ३६ लाख रुपये खर्च केले जातात. तर जनावरांच्या खाद्यावर ६४ हजार रुपये खर्च करण्यात आले असून, पकडलेल्या जनावरांच्या मालकाकडून वर्षभरात ४ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...