आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाकडून राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. शासकीय योजनांमध्ये जनतेचा सहभाग आणि त्यांना सहभागी करून घेणे हे महत्त्वाचे आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनता यांचे महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन कार्यातून गतिमान शासन अशी मानसिकता ठेवून सकारात्मक पद्धतीने कामकाज करण्यात यावे. शासन आपल्या दारी या धर्तीवर महाराजस्व अभियानाचे गाव पातळीवर लोकांची तसेच शेतकऱ्यांची कामे गतिमान पद्धतीने पूर्ण व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केले.
येथील महसूल विभागाच्या वतीने तहसील गोडाऊनमध्ये आयोजित महाराजस्व अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अभियानाचे आयोजनांतर्गत विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, हेच ध्येय अभियानाचे असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात महाराजस्व अभियान शासन राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते उपस्थित होते.
तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर कराड, मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया टवलारे,तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता उमाळे, गटविकास अधिकारी अशोक बांगर, नायब तहसीलदार प्रदीप पांडे, नायब तहसीलदार राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या विविध विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या २० स्टॉलवर प्रत्यक्ष जाऊन त्याचे निरीक्षण करून जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी माहिती घेऊन, विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व त्यांच्या योजनेचे पत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार बनसोड यांनी केले .उपस्थितांचे आभार तालुका पुरवठा निरीक्षक चैताली यादव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता महसूल विभागाचे श्रीकांत नागरे, अशोक वाकोडे यासह कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.