आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिमान आगामी हंगामात तरी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती उत्पादन, तयार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करीत सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना सोबत घेत मूर्तिकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मूर्तिकार व वंचितच्या नेत्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याशी संवाद साधला. या बाबत मंगळवारी आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा अधनियमातील तरतुदीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचे उत्पादन, वितरण व विक्रीस शुक्रवार ,१ मे २०२२ पासून प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता. त्यामुळे मूर्तिकला केंद्रांवर काही दिवसांपासून महसूल वभागातर्फे छापा टाकून साहित्य जप्त करण्यात येत आहे. दरम्यान सोमवारी वंचित आघाडीचे व्यापारी नेते मनोहर पंजवाणी, अॅड. संतोष राहाटे यांनी मूर्तिकारांसोबत येवून जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांकडे त्यांनी भावना व्यक्त केल्या. यंदा पीओपी फ्री गणेशोत्सव आगामी गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्तीची विक्री करणाऱ्या तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. पीओपीच्या मूर्ती बनवण्यास शुक्रवार १ मे २०२२ पासून प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे आता पीओपीच्या मूर्ती आढळून आल्यास मूर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मूर्तिकारांनी काढला मोर्चा, ‘आरडीसीं’शी केली चर्चा अधिनियमान्वये तरतूद पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम १९८६ मधील तरतूदीनुसार आदेश निर्गमित केले. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीस हद्दपार होण्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी २०२२ च्या गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित केले आहे. अकोला येथे मूर्तिकारांना सोबत घेत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येत प्रशासनानाला निवेदन देवून चर्चा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.