आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:जिद्द, चिकाटी, कार्यतत्परता हेच यशाचे खरे गमक : प्राचार्य डॉ. मधुकर पवार; जीएनए महाविद्यालयात ‘रासेयो’ व ‘करिअर कट्टा’ यांचा संयुक्त उपक्रम

बार्शीटाकळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ व जिद्द, चिकाटीने कार्य केल्यास सर्व कार्यात यश प्राप्त करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. राजीव बोरकर आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांनी केले. गुलाम नबी आजाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे राष्ट्रीय सेवा योजना व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजीव बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर डॉ. मधुकर पवार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे यशवंत शितोळे, डॉ. राजीव बोरकर, डॉ. आर. आर. राठोड, डॉ. अमित वराळे, डॉ. संतोष हूशे, डॉ. सिद्धार्थ वाघमारे, डॉ. नीलिमा कंकाळे, डॉ. दिपक चौरपगार, प्रा. भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते.

यावेळी गुलाम नबी आजाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संगीत विभागाचे डॉ. राजीव बोरकर यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण येथे संचालकपदी नियुक्ती झाली. करिता डॉ. राजीव बोरकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यशवंत शितोळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मोहन बल्लाळ, डॉ. देवानंद मोहोड, डॉ. मनोज देशपांडे यांना आचार्य पदवीने सन्मानित केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

डॉ. आर. आर. राठोड, डॉ. अमित वैराळे, डॉ. संतोष हुशे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिपक चौरपगार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिद्धार्थ वाघमारे, आभार प्रदर्शन डॉ. दीपिका जैन यांनी केले. संगीत विभागाच्या वतीने डॉ. देवानंद मोहोड व त्यांच्या चमूने सुंदर गीत सादर केले. यावेळी कार्यक्रमाला डॉ. वैशाली कोटंबे, डॉ. वैशाली सोनोने, डॉ. दीपिका जैन, प्रा. आदित्य पवार, नीता पांडे, डॉ. संतोष सुरडकर, डॉ. तारेश आगासे, प्रा. सुधीर राऊत, प्रा. समता तायडे, डॉ. तेजस पाटील, डॉ. शरद ईढोळे, डॉ. धनराज खिराडे, प्रा. अनिल दडमल, नंदकुमार राऊत, अधीक्षक संजय बुटे, पिंटू पवार, रवींद्र भटकर, मुफीज खान, शांताराम जाधव, पंजाब जाधव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक मुंडे, ओंकार राठोड, विजय ढीसाळे, अभिषेक चव्हाण, मयुरी बिडवे, रिनल डोंगरे, वसीम खान, किरण राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...