आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार:भाकप-आयटकच्या वतीने फडकवला लाल बावटा; कामगार विरोधी कायद्यांविरुद्ध लढण्याचा निर्धार

अकाेला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार दनि, संयुक्त महाराष्ट्र दनिाचे औचित्य साधून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार युनियन पक्ष कार्यालयावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयाेजन केले हेाते. भाकप-आयटकच्या कार्यकर्त्यांनी ४७२ ठिकाणी लाल बावटा फडकवत कामगार विरोधी कायद्यांविरोधात लढण्याचा पुन्हा निर्धार केला.

भाकप व आयटकचे सचिव रमेश गायकवाड यांच्या हस्ते झेंडावंदन केले. कार्यक्रम सकाळी ९.३० वा. जुने शहरातील भाकप-आयटक जिल्हा कार्यालयात झाला. सकाळी ८ ते १० दरम्यान कार्यकर्त्यांनी घरांवर लाल झेंडा फडकवून लाल झेंड्याना सलामी दिली. कार्यक्रमात रमेश गायकवाड, रामचंद्र, नयन गायकवाड, ज्योती ताथोड, सुरेखा ठोसर, त्रिवेनी मानवटकर, एस. एन. सोनोने, कॉ. भा.ना. लांडे गुरूजी, सुनीता पाटील, मायावती बोरकर, सुरेखा ठोसर, सरोज मूर्तिजापूरकर, महानंदा ढोक, ज्योती ताथोड, कल्पना महल्ले, आशा जामने, मीरा खानिवाले, किरण तेलगोटे, आशा गावंडे, शीतल खुमकर, कल्पना जाधव, रामदास ठाकरे, अनंत सिरसाट, सुनीता वानखडे, सविता पिंपळे, वनमाला चांभारे, चंद्रकला शिंदे, राजू धोटे, वनिायक काळे, मनोज अग्रवाल, सोहनलाल वर्मा, सुमीत गायकवाड सहभागी झाले.

शहिदांना अभिवादन : भाकप-आयटकच्या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांना अभिवादन केले. रमेश गायकवाड यांनी जनतेला या कोरोना विषाणूशी व नवीन संमत झालेल्या अन्यायकारक कामगार विरोधी विरोधात एकत्र लढण्याचे आवाहन केले.

यांचा केला सत्कार : जागतिक कामगार दनि आणि संयुक्त महाराष्ट्र दनिाचे औचित्य साधून कष्टकऱ्यांना न्याय देणारे व्यक्तींचा सत्कार केाला. यात माथाडी मंडळ माजी निरीक्षक शांताराम मोरे, कृषी विद्यापीठ कामगार युनियनचे विद्याधर ढोरे, सुहास अग्निहोत्री, कुरुमदास, रमेश गुहे यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...