आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेराेजगारीविरोधात प्रकल्पग्रस्त संघटनेचे झुकझुक आंदाेलन:जिल्हाधिकारी कार्यालयामाेर धरणे; प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरतीची मागणी

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेराेजगारांच्या नाैकरीसाठी सुशिक्षित बेराेजगार प्रकल्पग्रस्त संघटनेने मंगळवारी झुकझुक आंदाेलन करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयामाेर केले आंदाेलन करीत प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरतीसह अन्य मागण्यांची पूर्तता करावी, असे संघटनेचे म्हणणे हाेते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.

देश व राज्य सुजलान सुफलाम व्हावे, यासाठी शेतकऱ्यांनी आपली लाख मोलाची जमीन, घरांची जमीन दिली. भूसंपादनानंतर संबंधित शेतकऱ्यांना याेग्य योग्य मोबदला मिळाला तर नाहीच; त्यांच्या पाल्यांना शासन निर्णयाव्दारे शासकीय नोकरीत समाविष्ट केले नाही, असे सुशिक्षित बेराेजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषण, निवेदने देण्यात आली. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याचा अाराेप करीत 1 नाेव्हेंबरला संघटनेने एका रांगेत चालत झुकझुक आंदाेलन केले. आंदाेलनात अध्यक्ष संजय धनाडे, गजानन विरेकर, राजे धुंडे, एकनाथ आंधळे, महादेव आढाव, महादेव आढाव, विजय चव्हाण, अभिजित भोजने, नदीम शेख, राहुल पाचपिल्ले तायडे गुरुजी आदी सहभागी केले.

या आहेत मागण्या

सुिशक्षित बेराेजगार प्रकल्पग्रस्त संघटनेने काही प्रमुख मागण्यांसाठी आंदाेलन केले.

  • राज्यात 5 टक्के प्रमाणात प्रकल्प ग्रस्तांचे विशेष भरती म्हणून सुरू करावी.
  • बांधकाम व पाटबंधारे यांच्या तांत्रिक भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना स्थान देण्यात यावे.
  • राज्यसेवा परिक्षेत वर्ग 3 मध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात यावे.
  • पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीवर अनेक प्रकल्पग्रस्त असून त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे.
  • उमा प्रकल्प येथे त्याच प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त सद्यस्थितीत कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. त्यांना कायमरस्वरुपी रूजू करून घेण्यासाठी निर्णय घेण्यात यावा.
  • औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात नर्सिंग कोर्स, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी शैक्षणिक सवलती द्याव्यात.
  • वयोमर्यादा संपुष्टात आल्याने अनेक प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित राहत आहेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांची नोकरी भरती प्रक्रियेतील वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावी.
  • अकाेला-अकाेट मार्गावरील गांधीग्राम येथील पूल शिकस्त झाला आहे. पूल बंद असल्याने जनतेचे हाल होत आहे. त्यामुळे तातडीने अकोला रेल्वे ते अकोट दरम्यान शटल सुरू करण्यात यावी.
बातम्या आणखी आहेत...