आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:अज्ञात आजारामुळे रिधोरा येथे डुकरांचा एका पाठोपाठ एक मृत्यू

बाळापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रिधोरा येथे अज्ञात आजारामुळे एकापाठोपाठ एक डुकरे दगावत असल्याने गावात खळबळ उडाली आहे. डुकरांच्या या मृत्यूमागचे ठोस कारण अद्याप समोर आले नसले तरी डुकरे मरून पडत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरात पन्नासहून अधिक डुकरांचा मृत्यू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी या बाबीला दुजोरा दिला नाही. पुणे येथील प्रयोगशाळेचा उर्वरित. पान ४

अहवाल आल्यानंतर कारण होईल स्पष्ट
रिधोरा येथे डुकरांचे मृत्यू झाले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कारणांचा शोध घेण्यासाठी डुकराचा मृतदेह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पुढे मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.डॉ. नरेंद्र अरबट, पशू संवर्धन अधिकारी, बाळापूर

पशुसंवर्धन विभागाला माहिती कळवली
डुक्कर मारण्यासाठी विषारी औषध देणे किंवा डुकरांमध्ये साथीचा आजार असणे अशी कारणे यामागे असू शकतात. डुकरांमध्ये साथीचा आजार पसरणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक होऊ शकते. त्यामुळे डुकरांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने पशू संवर्धन विभागाला कळवण्यात आले आहे.संजय अघडते, सरपंच, ग्रामपंचायत, रिधोरा

बातम्या आणखी आहेत...