आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या विविध भागात कपाशीच्या पिकांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या संकटाने तोंड वर काढले. अकोला, बार्शीटाकळी,अकोट तालुक्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळला. त्यामुळे सध्याच्या अफेक्टेड एरीयात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास येणाऱ्या २० दिवसानंतर बोंडअळीचा प्रसार इतरत्र भागात होण्याचा धोका कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्या जी कपाशी पिके ३० ते ३५ दिवसांची आहेत. या पिकात पुढील २० दिवसानंतर बोंडअळीच्या प्रादूर्भाव वाढीची शक्यता विद्यापीठ तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाच्या चमूकडून अकोला, बार्शीटाकळी तालुक्यातील कॉटन जीनिंग मिलच्या बाजुला असलेल्या कपाशीच्या शेतात बोंडअळीची पाहणी केली. तेव्हा बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळला.
प्रत्येक कामगंध सापळ्यात सरासरी चार ते पाच प्रौढ गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळले. काही ठिकाणी चिमलेल्या अवस्थेत फुले, डोमकळी अवस्थेतीत फुले दिसली. ही फुले हाती अलगद निघून येत आहेत. यात गुलाबी बोंड अळी दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत फुलामधून कोवळ्या बोंडात शिरताना आढळत आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक निरीक्षण करावे. बोंडअळीचा प्रादूर्भाव इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता आहे.वेळीच व्यवस्थापन न केल्यास २० दिवसानंतर प्रादूर्भाव वाढू शकतो.बोंडअळी रोखण्यासाठी पीक ९० दिवसाचे होईपर्यंत दर आठवड्यात सर्वेक्षण करा. डोकमळ्या वेचून नष्ट करा. एकरी दोन फेरोमोन सापडे लावा. अडकलेले पतंग दर आठवड्याने नष्ट करा.
ट्रायकोकार्ड कपाशी पिकामध्ये लावावे. सापळ्यात पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याबरोबर ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडीरेक्टीन अझाडीरेकटीण १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. डॉ. डी. बी. उंदिरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.
५० ते ६० टक्के प्रादूर्भाव : बोरगाव मंजू, बाभूळगाव येथे काही शेतांत बोंडअळीचा ५० ते ६० टक्के प्रादूर्भाव आढळला आहे. बार्शीटाकळीतील काही शेतात ३० ते ४० टक्के प्रादूर्भाव आढळला आहे.
बार्शीटाकळी, अकोल्यात आढळलेला बोंडअळीचा प्रादुर्भाव.
जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी, अकोट तालुक्याचा समावेश
कपाशीचे पिक ३० ते ४० दिवसांचे किंवा मोठे आहे. तेथे बोंड अळीची मादी उमलत्या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून दोन ते तीन दिवसात सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांत प्रवेश करतात व उमलणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्याच्या सहाय्याने बंद करून अळी फुलांत उपजीविका करते. अशी प्रादुर्भावग्रस्त फुले न उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. प्रादुर्भावग्रस्त फुलाला डोमकळी म्हणतात. त्यात बोंड अळी उपजीविका करते. अशा फुलांचे रूपांतर बोंडात होत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.