आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:बोरगाव मंजू येथील विपश्यना सेंटरवर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण

बोरगाव मंजू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी विश्व विद्यापीठद्वारा नियोजित विपश्यना केंद्र बोरगाव मंजू येथे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येथील विपश्यना केंद्रावर विपश्यना आचार्य नंदुकुमार तायडे यांच्या मार्गदर्शनात सामूहिक साधना व मंगल मैत्री देण्यात आली. तत्पूर्वी विपश्यना सेंटर बोरगाव मंजू ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बोरगाव मंजुतील विपश्यना केंद्र निसर्गरम्य परिसरात आहे. केंद्रामुळे लोकांना मनःशांती मिळणार आहे. तसेच केंद्राचा ५०० वृक्ष लावण्याचा उपक्रम उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या. कार्यक्रमाला बार्शीटाकळीचे नायब तहसीलदार शिवहरी थोबे, ज्ञानेश्वर खैरे, रवींद्र पोतदार, सुभाष बियाणी, अजय पहुरकर, वृक्षप्रेमी श्रीनाथन, मधुकर तायडे, आशा तायडे, यशोदा तायडे, मीना पोतदार, दादाराव तायडे, मनोज वानखडे, राहुल थोरात यांच्यासह असंख्य साधक, साधिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद मोहोड यांनी केले, तर आभार अजय पहुरकर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...