आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिशन जीवन रक्षकाची' मोठी कामगिरी:सुखद वार्ता; रेल्वे सुरक्षा दलाने 5 महिन्यांत वाचवले 31 जणांचे जीव

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात आरपीएफ कर्मचारी केवळ रेल्वेच्या मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी 'मिशन जीवन रक्षक' चा एक भाग म्हणून जानेवारी ते मे 2022 या कालावधीत मध्य रेल्वेवर काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत 31 जणांचे प्राण वाचवले आहेत.

'मिशन जीवन रक्षकाची' मोठी कामगिरी

या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या 31 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 16 जीव वाचवणाऱ्या घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ आणि नागपूर विभागात प्रत्येकी 6 जीवरक्षक घटना, पुणे विभागात 2 जीव वाचवण्याच्या घटनेची आणि सोलापूर विभागात एक जीव वाचवण्याच्या घटनेची नोंद झाली आहे.

अशी होती 2021 ची कामगिरी

2021 या वर्षात मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी 52 प्रवाशांचे प्राण वाचवले त्यापैकी 35 जीव वाचवण्याची प्रकरणे फक्त मुंबई विभागात नोंदवली गेली. रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. ते प्रवाशांच्या सुरक्षिततेवर बारीक लक्ष ठेवतात.

असे वाचवले प्राण

बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क आरपीएफने अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवला आहे.

बातम्या आणखी आहेत...