आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिकेज काढण्याचा पेच:‘जलप्रदाय’विरोधात पोलिस तक्रार दाखल ; पाण्याची होत आहे नासाडी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजनेतून शहरात ९२ कोटी खर्च करून जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीवरील लिकेज काढण्याचा पेच निर्माण झाला. जलवाहिनी टाकणाऱ्या कंत्राटदाराने करारात उल्लेख नसल्याने लिकेज काढण्याची जबाबदारी झटकली असून, मनपातर्फे नियुक्त झोन कंत्राटदारांनीही हे आमचे काम नव्हे म्हणून हात वर केले. त्यामुळे जलवाहिनीतून पाण्याची नासाडी होत असल्याने त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते नीलेश देव यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याची नोंद घेवून प्रकरण चौकशीत ठेवले आहे. शहरातील चारही झोनमध्ये अमृत योजनेतून ९२ कोटी खर्च करून जलवाहिनी टाकण्याचे काम केले.

बातम्या आणखी आहेत...