आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूतदया:हंबरडा फोडताच गायींच्या समोर पोलिस ठेवतात ढेप, खाल्ल्यानंतर गायी निघून जातात; अकाेल्यातील ठाणेदार उत्तमराव जाधव यांचा स्वखर्चातून उपक्रम

दिलीप ब्राम्हणे | अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात ठाणेदार यांच्या केबिनसमोर ढेपेच्या प्रतीक्षेत उभी असलेली गाय.
  • गायीने आवाज दिला की तणावमुक्तीचा भास होतो - उत्तमराव जाधव

पोलिस म्हटले की हातात दंडुका, कणखर स्वभाव, नुसते घेण्याचीच सवय तेथे देण्याचा विषय नाही आणि निगेटिव्ह प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. मात्र, सिटी कोतवाली पोलिसांनी हे खोटे ठरवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर एक नाही अशा किती तरी गायी येतात. त्या थेट ठाणेदारांच्या केबिनसमोर उभ्या राहतात. त्यानंतर पोलिस त्यांना एका भांड्यात सरकी ढेप घेऊन येतात आणि गायीसमोर टाकतात. त्यावर ताव मारल्यानंतर गाय निघून जाते. हे तासा-दर तासांनी सुरूच असते. जर एखाद्या वेळी ढेप द्यायला उशीर झाला तर गाय हंबरडा फोडते. कितीही कामकाजाच्या ताणतणावात असलो तर तिच्याकडे पाहून काहीसे हलके वाटते, अशी भावना ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी व्यक्त केली.

शहरातील मध्यवर्ती भागात सिटी कोतवाली पोलिस ठाणे आहे. कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात शहरात फिरणाऱ्या तसेच भाजी बाजाराच्या जवळपास वावरणाऱ्या जनावरांना उपासमारीचा सामना करावा लागला. या वेळी केवळ पोलिस रस्त्यावर होते. त्यामुळे बाहेरच्या जनजीवनाशी ते जुळून होते. सिटी कोतवाली परिसरात अशी अनेक जनावरे होती, त्यांना काहीतरी खायला दिले पाहिजे या उदात्त भावनेतून येथील ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी स्वखर्चातून ढेपेचे पोते त्यांच्या अँटी चेंबरमध्येच आणून ठेवले व बाहेर गाय किंवा जनावर दिसताच त्यांना थोडी-थोडी ढेप खायला देणे सुरू केले. गायींनाही येथे खायला मिळते म्हणून त्या दररोज ठाण्यासमोर येऊ लागल्या. गायी थेट पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात नव्हे तर ठाणेदारांच्या केबिनसमोर येऊन उभ्या राहतात व लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या वेळी कामात व्यग्र असल्याने जर ठाणेदारांचे लक्ष गेले नाही तर त्या हंबरडा फोडतात. त्यानंतर मात्र ठाण्यातील एखादा कर्मचारी पुढे येतो. एका भांड्यात ढेप आणतो व या गायीसमाेर टाकतो. ढेप खाल्ल्यावर तीच गाय पुढे निघून जाते. पोलिस ठाणे म्हणजे आपल्या मालकाचेच घर आहे, असे समजून एक प्रकारे गायी आपला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यावर जणू हक्क दाखवताहेत.

गायीने आवाज दिला की तणावमुक्तीचा भास होतो

आपण शेतकरी कुटुंबातील असल्याने आधीपासूनच जनावरांवर प्रेम आहे. कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असताना मुक्या जनावरांना ढेप दिल्यास त्यांना दिलासा मिळेल, या भावनेतून ढेप देणे सुरू केले आहे. आता गायींना सवयच पडली आहे. गायीला ढेप मिळण्यास उशीर जरी झाला तर ती जोरजोरात हंबरडा फोडते. तिच्या आवाजाने कितीही कामात असलो तर बरे वाटते. खायला मिळते म्हणून गायी येतात. जशा त्या प्रत्येक दारासमोर उभ्या तशा आमच्या दारात येऊन उभ्या राहतात, त्यांना काय देणे-घेणे, पोलिस स्टेशन आहे की काय. उत्तमराव जाधव, ठाणेदार सिटी कोतवाली