आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०२२ मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख ५२ हजार १५१ वाहनचालकांना वाहतूक नियंत्रण शाखेने ८ काेटी ८१ लाख ६६ हजार १०० रुपयांचा दंड आकाराला आहे. मात्र ३२ हजार ५० वाहन चालकांकडून केवळ १ काेटी ३९ लाख ३९ हजार १५० रुपयांचा दंड वसूल हाेऊ शकला. यावरून पोलिसांच्या कार्यवाहीला बेशिस्त वाहनचालक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकांची संख्या कमी नाही. वाहन चालवितांना माेबाईल फाेनचा वापर करणे, ट्रिपलसीट व चुकिच्या दिशेने वाहन चालवणे, वाहनाची कागदपत्रे व लायसन नसणे, नाे पार्किंग झाेनमध्ये वाहन उभे करणे ,असे प्रकार सर्रासपणे घडतात. अशा बेशिस्त वाहनाचालकांवर पाेिलस दंडात्मक कार्यवाही करतात. अनेकदा तर वाहनही जप्त करण्यात येते. मात्र त्यानंतरही बेशिस्तपणा कमी हाेत नसून, काही जण दर दंडही भरण्याचे टाळत असल्याचे जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत वाहतूक नियंत्रण शाखेने केलेल्या कार्यवाहीवाहीवर नजर टाकल्यास दिसून येते.
बेशिस्त वाहनचालकांना ८ काेटी ८१ लाख ६६ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी केवळ १ काेटी ३९ लाख ३९ हजार १५० रुपयांचा दंड वसूल हाेऊ शकला.
ई-चलानकडेही दुर्लक्ष
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाेिलसांकडून ई-चालनद्वारेही दंड आकारण्यात येताे.सन २०२२मध्ये एकूण १ लाख १६ हजार १०१ वाहन धारकांना दंड आकारण्यात आला आहे. मात्र एकुण ७ काेटी ४२ लाख २६ हजार ९५० रुपये थकले आहे. दंड प्रलंबित असलेल्या संबंधित वाहनधारांवर न्यायलयात खटले दाखल करण्यात येणार आहेत.
वाहतून फटाके फाेडणाऱ्यांना ‘फटाके’
दुचाकीच्या (बुलेट) मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून अथवा ते काढून फटाके फोडणारे सायलेन्सर बसविलेल्या १ हजार ५५८ वाहनधारकांवर दंडात्मक कार्याही करण्यात आली. डुप्लिकेट सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला आहे. याबाबत वाहतूक शाखेला तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी कार्यवाही केली. एकदा तर १८ दुचाकी जप्त झाल्यानंतरही हुल्लडबाजी थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
१५ हजारांवर ऑटाेरिक्षकांवर स्टिकर्स
प्रवासी व महिला सुरक्षेबाबत मोहीम राबविण्यात आली. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत जिल्ह्यातील ऑटोरिक्षा युनियन, असोसिएशन व संघटना यांची नियिमत बैठका घेण्यात आल्या. बैठकित त्यांना सूचना देण्यात आल्या. एकूण १५ हजार ८९२ ऑटाेिरक्षांवर फलक-स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.