आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाडी:गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पोलिसांचा छापा, 9 हजाराचा मुद्देमाल जप्त

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट तालुक्यातील ग्राम मोहाळा येथे पेट्रोलिंग करीत असतांना गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून 41 किलो 500 ग्राम गोवंश मांस, हत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार 3 जून रोजी दुपारी ग्राम मोहाळा येथील रहिवासी शेख मुख्तार शेख गणी हा इसम त्याच्या घरासमोर गोवंश मांसाची विक्रीचा व्यवसाय करीत होता. याची माहिती अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे यांना मिळताच त्यांनी पोलीस अंमलदारांसह ग्राम मोहाळा येथे छापा घातला.

या छाप्यात गोमांसाचे तुकडे, हाडे, वजन काटा, लोखंडी सुरा,लोखंडी कुर्हाड, अशा 9 हजार रूपयांचा मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर, पोलिस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे, उमेश चव्हाण, गोपाल जाधव, अमोल बुंदे, महिला पोलिस अंमलदार अनिता सपकाळ यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...