आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हातभट्टीच्या अड्ड्यावर पाेलिसांचा छापा; दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरातील हुळी नाल्याकाठी असलेल्या हातभट्टीवर पाेलिसांच्या विशेष पथकाने रविवारी छापा टाकला. छाप्यात पाेलिसांनी हातभट्टीची दारु जप्त करत दाेन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात अवैध दारू विक्रेते आणि हातभट्ट्यांवर पाेलिसांनी अनेकदा छापा टाकले. मात्र तरीही हातभट्टी बंद हाेत नसल्याचे दिसून येत आहे. गस्तीवर असलेल्या पाेलिसांच्या विशेष पथकाला चान्नी-आलेगाव परिसरातील हुळी नाल्याकाठी वेगवेगळ्या ठिकाणी काही जण मोहापासून गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने छापा टाकला. हुळी नाल्याकाठी देवदत्त उर्फ कांचा सुखदेव तेलगोटे (वय ४६ रा. भीम नगर आलेगाव) याच्याकडे मोहमाच सडवा (किंमत अंदाजे २० हजार ४०० रुपये) गावठी दारू ४० लिटर (किंमत ४ हजार रुपये) असा एकूण २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच याच परिसरात राहुल भगवान वानखेडे (वय २४ रा. आलेगाव) याच्याकडे मोहमाच सडवा (किंमत १४ हजार ४०० रुपये) गावरान दारू ३० लिटर (किंमत ३ हजार रुपये) असा एकूण १७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी चान्नी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...