आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरती:पोलिस मुख्यालयासह वसंत देसाई मध्ये पोलिस भरती सुरू

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस शिपाई पदासाठीच्या भरतीला सोमवारपासून पोलिस मुख्यालय व वसंत देसाई स्टेडिअममध्ये सुरूवात झाली आहे. ३३६ पदांसाठी ही भरती होत आहे. ही भरती प्रक्रिया दररोज सकाळी ६ वाजतापासून ते ११ वाजेपर्यंत राबवण्यात येत आहे. दरम्यान लक्झरी बसस्टॅण्ड ते सरकारी बगीचा, अग्रसेन चौक ते दामले चौक मार्गावरील वाहतूक ही सकाळी ११ वाजेपर्यंत लक्झरी बस स्टॅण्ड जेल चौक, अशोक वाटिका, कलेक्टर ऑफिस, सरकारी बगीचा जाण्या- येण्या करीता सुरू राहील. अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन, तार ऑफिस, न्यू इंग्लिश हायस्कूल, दामले चौक या मार्गाने वाहतूक सूरू राहील. ३३६ पदांसाठीच्या या भरतीसाठी चार हजारहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

पोलिस भरतीसाठी येताना उमेदवारांनी मोबाइल सोबत आणू नये, मूळ कागदपत्रे व चार पासपोर्ट फोटोच सोबत ठेवता येणार आहेत. कोणत्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष भरतीची वेळ सहा वाजता असताना उमेदवार सकाळी ४ वाजतापासून ताटकळत असल्याने काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...