आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्णा नदीतून अवैध रेतीचा उपसा:पोलिसांनी 3 ट्रॅक्टर जप्त; तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्णा नदीत अवैध रेती उपसा करून सांगवी मोहाडीकडून अकोल्याकडे येत असलेला ट्रॅक्टर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी जप्त केला. तीन आरोपीवरही कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष पथकास माहिती मिळाली की, सांगवी मोहाडी येथील प्रमोद पाटोळे हा एमएच ३० जे ७४०० या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये मोर्णा नदीपात्रातून विनपरवाना उपसा करून त्याची विक्री करण्याकरिता सांगवी मोहाडी येथून अकोलाकडे येत आहे. या माहितीवरून सुकोडा फाट्या जवळील जयस्वाल बिअर शॉपी जवळ नाकाबंदी करून ट्रॅक्टर थांबविण्यात आला. त्यातील एक चालक व मालक प्रमोद रतन पाटोले हा ट्रॅक्टरसोडून पळून गेला.

ट्रॅक्टर बाजूला घेऊन ट्रॅक्टरमधील ओकेश चंद्रमणी शिरसाट (३० रा. भोड), महेंद्र गौतम शिरसाट (३८ रा. भोड) या दोघांना ताब्यात घेतले. त्याने पळून गेलेला इसम हा प्रमोद रतनराव पटोले (४०, रा. सांगवी मोहाडी) असून, ट्रॅक्टरही त्याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. ट्रॅक्टरमध्ये सात हजार रुपयांची एक ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी एकूण सह लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रेतीच्या रॉयल्टी बाबत विचारले असता ते उडवा उडवीची उत्तर देत असल्याने व त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने अकोट फैल पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन होत आहे. तसेच बाळापूर तालुक्यात सर्वाधिक रेतीचे उत्खनन होत आहे. त्यावर प्रशासनाने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...