आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलखोल:आयुक्तांसमोर अधिकाऱ्यांची आमदार शर्मांकडून पोलखोल ; नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात बैठक

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार गोवर्धन शर्मा यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल केली. पश्चिम झोनसह विविध भागातील मोठे नाले साफ न झाल्याचा दावाच त्यांनी केला नाही तर बुधवारी चला, तुम्हाला नाले दाखवतो, असे आव्हानही दिले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या या कानउघाडणीमुळे मनपा अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजना संदर्भात आमदारांना माहिती देण्यासाठी बैठक, प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. मनपा स्थायी समिती सभागृहात बैठकीला आयुक्त कविता द्विवेदी उपस्थित होत्या. त्यात चारही झोनच्या अधिकाऱ्यांनी झोनमधील नाले साफ झाल्याची माहिती दिली. यावर आमदार गोवर्धन शर्मा यांनी त्यांची कानउघाडणी केली. ते म्हणाले, नाल्यातील पाणी सखल भागात साचण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे कोणत्या नाल्यातील पाणी वस्तीत शिरते. याची माहिती अधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे. ज्या नाल्यातील पाणी वस्तीत शिरते. त्याची सफाई करणे गरजेचे असताना सर्व नाले सफाइचे काम हाती घेतले जाते. यात ज्यातील पाणी वस्तीत शिरते, त्यांची सफाई होत नाही. पश्चिम झोनमधील नाले सफाई झाल्याचे सांगता, मात्र जाजू नगर, बापू नगरातील नाले सफाई झाली का? असा प्रश्न आमदार शर्मा यांनी करुन बुधवारी या, मी तुम्हाला नाले दाखवतो, असे आव्हान दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी बुधवारी नाले साफ करतो, असे स्पष्ट केले. या बैठकीला आमदार वसंत खंडेलवाल, आमदार नितीन देशमुख ही उपस्थित होते. आयुक्त मॅडम, असे आहेत तुमचे अधिकारी! आमदारांनी नाल्यांबाबत अधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर बुधवारी नाल्यांची सफाई करतो, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले, आयुक्त मॅडम असे आहेत, तुमचे अधिकारी. महापालिका आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत आमदार गोवर्धन शर्मा यांनी नाल्यांच्या सफाईसंदर्भात आयुक्तांसमाेर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बातम्या आणखी आहेत...