आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसाधारण सभा:पाणी योजनांच्या ठरावावरून घमासान होण्याची शक्यता ; जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि. प.ची सर्वसाधारण सभा मंगळवारी होत असून, विषयसूचीवर ९ विषयांचा समावेश राहणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षा, सभापती यांची पदाधिकारी म्हणून ही अखेरची सर्वसाधारण सभा आहे. सभेत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ताब्यात घेण्याचा ठराव विषय सूचीवर नसल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

जानेवारी २०२० मध्ये जि. प.त वंचित आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. जुलैत पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे २१ जूनला होणारी सर्वसाधारण सभा ही सत्ताधाऱ्यांच्या पहिल्यार्ममधील शेवटची राहणारआहे. त्यामुळे या सभेच्या विषय सूचीवर पाणी पुरवठ्यासह प्रलंबित विषय निकाली निघण्यासाठी नमूद असते, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

न्यायप्रविष्ट प्रकरणही विषय सूचीवर ः ओबीसी आरक्षणामुळे जि.प.च्या रिक्त झालेल्या दोन सभापतिपदांच्या निवडणुकीत वंचितचा पराभव करीत महाविकास आघाडीने २९ ऑक्टोबर रोजी बाजी मारली होती. महिला बाल कल्याण सभापतीपदाच्या नविडणुकीत स्फूर्ती गावंडे तर, विषय समिती सभपतीपदासाठी सम्राट डोंगरदविे यांची अविरोध नविड झाली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेवर वंचितच्या सदस्याने आक्षेप घेतल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित झाले. तरीही २१ जूनला होणाऱ्या सभेच्या सूचीवर सभापतींना विषय समित्यांचा प्रभार सोपविण्याचा विषय क्रमांक २ वर नमूद करण्यात आला आहे.

हे आहेत विषय ः विषय सूचीवर एकूण ९ विषयांचा समावेश आहे. यात २३ मार्च रोजी झालेल्या सभेचे इतविृत्त मंजूर करणे, शाळा खोली बांधकाम व अन्य साहित्याच्या लिलावातून मिळालेली रक्कम खर्च करण्यास मंजुरी देणे, दहिहंडा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा हस्तांरित करणे, भटोरी व खिरपुरी येथील आरोग्य उपकेंद्राची कामाची निविदा स्वीकरणे आदी विषयांचा समावेश आहे.

जि.प.च्या सभेच्या विषय सूचीवर १३ पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करून घेण्याचे विषय नाहीत या योजना अटी-शर्तींविनाच हस्तांतरित करून घेण्याचा ठराव हवा आहे, असे पत्र योजना तयार करणाऱ्या जीवन प्राधिकरणाने जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठराव तयार केले होते. मात्र हे ठरावच विषय सूचीवर नमूद केले नाहीत. त्यामुळे जि.प.तील कुरघोडीच्या राजकारणाचा फटका पाणी पुरवठा योजनांना बसत आहे. पाणी पुरवठा योजनांचे १३ ठराव रखडले

बातम्या आणखी आहेत...