आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेचा शोध:रखडलेल्या जलकुंभाच्या कामाचे पैसे परत जाण्याची शक्यता ; कामाचे आदेश देऊन ही विरोध

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत डाबकी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाचे आदेश देण्यात आले. मात्र या कामास पुन्हा विरोध झाला. त्यामुळे काम थांबवण्यात आले. या जलकुंभाच्या बांधकामासाठी नव्या जागेचा शोधही घेण्यात आला नाही. त्यामुळे या जलकुंभाच्या कामाचे पैसे परत जाण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या सबलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यात शहरात (मूळ हद्द) आठ नवीन जलकुंभाचे बांधकाम केले जाणार होते. यापैकी सात जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. यातून पाणी पुरवठाही सुरू केला, तर जुने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात एक १८ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार होता. मात्र या जलकुंभाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे या जलकुंभाचे काम रखडले होते. कंत्राटदाराने काम सुरू करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली. यासाठी मनपाने सात लाख रुपयांचा भरणा पोलिस प्रशासनाकडे केला. परंतु विविध कारणांनी बंदोबस्त न मिळाल्याने जलकुंभाचे काम सुरू झाले नाही. दरम्यान तीन वर्ष लोटल्यामुळे मनपाने अमृत योजनेच्या तांत्रिक समितीकडे पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यासाठी मंजुरी मागितली. मंजुरीनंतर जलकुंभाच्या कामाच्या पुन्हा निविदा बोलावल्या. जलकुंभाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी पोलिस संरक्षणही पुरवण्यात आले. मात्र पुन्हा परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याने प्रशासनाने काम बंद केले. कंत्राटदाराला दिलेले कामाचे आदेश अद्याप प्रशासनाने रद्द केले नाही तसेच कामही सुरू केले नाही. त्यामुळे २.५० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

जलकुंभासाठी जागाच नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर महापालिकेची बंद पडलेली शाळा आहे. या शाळा परिसरात जलकुंभाचे बांधकाम करता येऊ शकते. मात्र शाळेलगतच ११ केव्ही उपकेंद्र आहे. त्यामुळे येथे जलकुंभ बांधणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ही जागा वापरता येणार नाही. डीपीआरनुसार हा जलकुंभ बांधण्यात येणार होता. त्यामुळे अन्य ठिकाणी या जलकुंभाचे काम करता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...