आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाक अदालत:अकोला येथे 24 जूनला डाक अदालत ;  व्यक्तीने स्वत:चे खर्चाने हजर राहावे

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाक सेवे बाबत जसे टपाल, स्पीड पोस्ट डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर बाबतची तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी शुक्रवार २४ जुन रोजी अकोला प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय येथे डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार डाक अदालतीत आपली तक्रार देतांना अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख. एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपली तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हील लाइन्स, अकोला यांच्याकडे सोमवार २० जून पूर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी. ही डाक अदालत शुक्रवार २४ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हील लाइन्स, अकोला येथे होईल. डाक अदालतीत अर्जदार व्यक्तीने स्वत:चे खर्चाने हजर राहावे, असे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे, अशी माहिती टपाल विभागाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...