आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रलंबित मागण्या कालबद्ध पद्धतीने पूर्ण होत नसल्याने जिल्हा परिषद परिचारिका संघटनने 20 जूनपासून दिलेल्या आंदोलनाच्या हाकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य सभापती, सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या नेते, आरोग्य विभाग व संघटनेमध्ये काल संध्याकाळी चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
परिचारिकांचे मानधन स्थगित
परिचारिकांची दहा वर्षांपासून पदेन्नतीची प्रक्रिया रखडली आहे. आरोग्य सेविका सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या असतानाही त्यांना सेवेत कायम अडथळे आल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. प्रथम नियुक्ती दिनांकापासून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. संपूर्ण प्रकारच्या डाटा एन्ट्रीचे काम आरोग्य सेविकांना देण्यात आले आहे. आरोग्य सेविका डाटा एंट्री ऑपरेटर नसून, संपूर्ण प्रकारच्या डाटा एंट्री काढणे आवश्यक आहे. आरोग्य वर्धनी उपकेंद्रअंतर्गत 1500 रुपये मानधन आरोग्य सेविकेला अद्यापही मिळालेले नाही, असेही त्यांचे म्हणणे होते.
आंदोलन टळले
दरम्यान, परिचारिका संघटना व आरोग्य सभापती सावित्री राठोड, वंचितचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली. दोन्ही बाजूने आपापली बांजू मांडण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संप करण्यास परावृत्त व्हावेत असे पत्र परिचारिकांडून लिहून घेतले. त्यामुळे तूर्तास आंदोलनाला स्थगिती देण्यात आल्याचे संघटनेने कळवले आहे. चर्चेत संघटनेकडून जिल्हाध्यक्षा संगीता जाधव, उपाध्यक्षा, जया काळे, कार्याध्यक्षा सविता केदार, सचिव, ज्योती रोटे, वृंदा विजयकर, दुर्गा पवार, सुनंदा गावंडे उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.