आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोलेश्वर मार्गातील खड्डा ठरतोय जीवघेणा:अपघात झाल्यावर खड्डा झाकणार का? नागरिकांची चर्चा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेब ठाकरे उद्यान (सरकारी बगीचा) ते महाराणा प्रताप चौक (शहर कोतवाली) मार्गावर डग (केबल) चा खड्डा वाहनधारकांसाठी जिवघेणा ठरत आहे. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघात होतात. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. हा खड्डा मोठा अपघात झाल्यानंतर झाकणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

बाळासाहेब ठाकरे उद्यान ते महाराणा प्रताप चौक उद्यान या मार्गाचे काही महिन्यांपूर्वीच कॉक्रीटीकरण झाले आहे. हा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, जुने पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद आदी शासकीय कार्यालयांशी जोडला आहे. तसेच या मार्गावर शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने देखिल आहे. विशेष म्हणजे या मार्गाने माजी लोकप्रतिनिधींचेही जाणे-येणे असते. परंतु अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी देखिल या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याच बरोबर जुने शहरातील नागरिक राजेश्वर सेतुने नविन शहरात येतात, तो रस्ताही याच मार्गाला जोडलेला आहे. या मार्गाला वळण आहे. या वळणावरच भूमिगत डग (केबल) बॉक्स तयार केला आहे.

होतात अपघात

हा बॉक्स रस्त्याच्या मधोमध आहे. या बॉक्सवर लोखंडी झाकण टाकण्यात आले होते. मात्र हे झाकण तकलादू असल्याने काही महिन्यातच तुटले. त्यामुळे डगचा एक बाय बाय एक फूट चौकोनी खड्डा झाला आहे. हा खड्डा वाहनधारकाला दुरुन दिसत नाही. त्यामुळे अनेक दुचाकी धारक या खड्ड्यामुळे अपघात होवून जखमी झाले आहे. विशेष म्हणजे खड्ड्याजवळच वळण असल्याने वाहने वेगाने येतात. याच वळणावर महाराणा प्रताप विद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही जाणे-येणे सुरु असते. त्यामुळे या रस्ता अपघात प्रवण स्थळ बनला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी या खड्ड्यात झाडाची डांग तसेच दगड ठेवून वाहन धारकाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या दगडालाही दुचाकी वाहन चालक धडकतात. त्यामुळे हा खड्डा जिवघेणा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या डगच्या खड्ड्यावर त्वरित मजबुत लोखंडी झाकण टाकावे, अशी मागणी वाहन धारक तसेच विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...