आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर पंचायत समितीमधील मोरगाव सादीजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री.प्रभाकरराव निकाडे गुरुजी हे शासनाच्या नियतवयोमानानुसार 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.यानिमित्ताने उरळ बु.केंद्रातील शिक्षकांची शिक्षण परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गोपाल बंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास अकोला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ.आम्रपाली खंडारे, बाळापूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा स्काऊट जिल्हा संस्थेचे सहाय्यक जिल्हा आयुक्त श्री. गौतम बडवे साहेब,उपसरपंच योगेश बंड, माजी सरपंच राजू टेकाडे,माजी सभापती भारत निकाडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वाघ,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सर्वश्री. विठ्ठलराव वाघ,नाजीम शहा, ज्ञानेश्वर उमाळे, गजानन सोळंके, स्नेहा निकाडे, जयश्री सरदार, उज्वला निकाडे, प्रेमानंद शेगोकार,ग्राम पंचायत सदस्या वैशाली कवर,सुचित्रा निकाडे, मीराबाई उंबरकार,माजी अध्यक्ष अनिल टेकाडे,माजी मुख्याध्यापक सचिन काठोळे,सेवानिवृत्त शिक्षक गोपालसिंह गौतम, सामाजिक कार्यकर्ते वसंता सोळंके , कवर गुरुजी व अरुण वानखडे इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या 37 वर्षाच्या सेवाकाळात केलेल्या सातत्यपूर्ण व प्रशंसनीय सेवेच्या गौरवार्थ शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकरराव निकाडे गुरुजी यांचा शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, उरळ बु.केंद्र व गावकऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
भारत स्काऊट आणि गाईड राष्ट्रीय संस्था नवी दिल्लीच्या वतीने कब बुलबुल विभागातून राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च "गोल्डन ऍरो अवॉर्ड" साठी निवड झालेल्या शाळेतील 15 कब बुलबुलचा सन्मान देखील याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजकुमार वानखडे यांनी, सूत्रसंचालन लीडर ट्रेनर श्रीकृष्ण डांबलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा गोपनारायण यांनी मानले.
प्रभाकरराव निकाडे गुरुजी यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनोगत व्यक्त करणारी विद्यार्थी प्रतिनिधी कु.भक्ती वाघ व चि. सुमित वाघ यांच्यासह समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे,गौतम बडवे,शिक्षण विस्तार अधिकारी गौतम बडवे, सचिन काठोळे,भारत निकाडे, प्रेमानंद शेगोकार,कवर गुरुजी यांची समयोचित भाषणे झालीत.सत्काराला उत्तर देतांना निकाडे गुरुजींनी सामाजिक कार्याची वसा सेवानिवृत्तीनंतरही पुढे चालवण्याचा संकल्प करित केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी प्रभाकर निकाडे सरांच्या वतीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद सर्वश्री.प्रमोद बगले,स्मिता देवकर, सुषमा मेहेकरे, मनीषा सर्वज्ञ,विद्या सिरसाट, शालेय पोषण आहार कर्मचारी बाळाभाऊ निकाडे व ज्योतीबाई निकाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास उरळ केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.