आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईस्टर संडेनिमित्त‎ जिल्ह्यात प्रार्थना, दिंडी‎:प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेल्या शिकवणीचे‎ आचरण करा : पास्टर अनिल निकाळजे‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिश्चन कॉलनी स्थित बेथेल‎ सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये‎ रविवारी ईस्टर संडेनिमित्त विशेष‎ प्रार्थना सभेचे आयाेजन केले हाेते.‎ ख्रिश्चन व्यक्तीचे जीवन कसे असावे,‎ यावर प्रकाश टाकतानाच अंधाराची‎ कर्मे टाकून द्या आणि स्वच्छ जीवन‎ जगा, खोटे बोलू नका, व्यसनाच्या‎ अधिन होऊ नका, लबाडी करू नका,‎ प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण‎ आचरणात आणा, असे आवाहन‎ पास्टर अनिल निकाळजे यांनी‎ याप्रसंगी केले.‎ शहरासह जिल्ह्याच्या विविध‎ भागात रविवारी, ९ एप्रिलला ईस्टर संडे‎ अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या‎ पुनरुत्थानाचा दिवस ख्रिश्चन‎ समाजबांधवांनी साजरा केला.‎ आबालवृद्धांनी या सणाचा आनंद‎ लुटला.

शहरातील प्रोटेस्टंट आणि‎ रोमन कॅथलिक प्रार्थनास्थळांमध्ये‎ विशेष प्रार्थनासभांचे, विविध धार्मिक‎ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे‎ आयोजन केले होते.‎ गत रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या‎ यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात‎ पाल्म संडे अर्थात झावळ्यांचा रविवार‎ साजरा केला. त्यानंतर अखिल‎ मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू‎ येशूंनी क्रूसखांबावर दिलेल्या‎ बलिदानाची आठवण म्हणून जगभरात‎ ७ एप्रिलला गुड फ्रायडे अर्थात उत्तम‎ शुक्रवार हा सण साजरा केला आणि‎ रविवारी , ९ एप्रिलला येशूंच्या‎ पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे‎ हर्षोल्हासात साजरा झाला.

शहर‎ आणि जिल्ह्यात प्रोटेस्टंट आणि‎ कॅथलिक अशा दोन्ही पंथांच्या सुमारे‎ ३० चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी‎ आयोजन केले.‎ सकाळी नऊ वाजता ख्रिश्चन‎ कॉलनीमधून ज्येष्ठ सदस्य जस्टीन‎ मेश्रामकर, पंच मंडळातील राजेश‎ ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर,‎ चंद्रकांत ढिलपे, सरला मेश्रामकर,‎ अरविंद बिरपॉल यांच्या नेतृत्वात दिंडी‎ काढली. या वेळी प्रभू उठला आहे,‎ खरोखर उठला आहे, अशा घोषणा‎ देण्यात आल्या. लेझीम खेळून आनंद‎ साजरा केला. या वेळी ईस्टर‎ संडेनिमित्त येशूच्या जीवनावर‎ आधारित नाटिका सादर केली. विविध‎ गीते सादर केली आणि पुनरुत्थानाचा‎ आनंद व्यक्त केला.‎

विविध चर्चमधील नवतरुणांना‎ बाप्तिम्स्मा देण्यात आला. लहान‎ बालकांची अर्पणेही केली. गेल्या‎ चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन‎ धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरू‎ होता. या चाळीस दिवसांच्या काळात‎ ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि‎ प्रार्थना करतात. ईस्टर संडेच्या दिवशी‎ या उपवासांची सांगता होते. शहरातील‎ सर्वच चर्चेसमध्ये ईस्टर संडे मोठ्या‎ हर्षोल्हासात साजरा केला.‎