आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1126 लाभार्थ्यांचा घराचा मार्ग मोकळा!:मार्गदर्शन मेळाव्यामुळे लाभ, गुंठेवारी प्लॉटधारकांचे रखडले होते मंजुर झालेले घरकुल

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेत मंजुर लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ५७० लाभार्थ्यांचे गुंठेवारी नियमानुकल करण्यात आले तर ५५६ लाभार्थ्यांचे नकाशे मंजुर करण्यात आले. यापैकी प्रत्यक्षात २२८ लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम सुरु करण्यात आला आहे. आयुक्त कविता द्विवेदी यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या शिबिरामुळे हजारो घरकुलांचा प्रश्न निकाली निघाला.

पंतप्रधान आवास योजनेत गुंठेवारी प्लॉट धारकांचे २९४० घरकुले मंजुर करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळताना अडचणी येत होत्या. यातील मोठी अडचण होती, गुंठेवारीचे नियमानुकुल करणे. परिणामी घरकुल मंजुर होवून तीन वर्षा नंतरही हा प्रश्न निकाली निघाला नाही. गुंठेवारीचे नियमानुकुल सुरु करण्यात आल्या नंतर लाभार्थ्यांना नेमकी कोणती कागदपत्रे सादर करायची? याबाबत माहिती नसल्याने हजारो लाभार्थी लाभापासून वंचित होते.

ही महत्वाची बाब लक्षात घेवून आयुक्त कविता द्विवेदी यांनी घरकुल मंजुर लाभार्थ्यांसाठी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मार्गदर्शन मेळावा सुरु केला. या मेळाव्यात नेमकी कोण-कोणती कागदपत्रे लागणार? याची माहिती देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांना सर्व बाबी समजुन सांगण्यात आल्या. या मेळाव्यात आयुक्तांनी पूर्णत: उपस्थिती लावली. यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 हजार लाभार्थी कागदपत्रे सादर करु शकले नाहीत

गुंठेवारीच्या २९४० लाभार्थ्यांपैकी एक हजार लाभार्थी अद्यापही कागदपत्रे सादर करु शकलेले नाहीत. या लाभार्थ्यांना कागदपत्रांची माहिती देवूनही कागदपत्रे सादर न केल्याने या लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाने लाभार्थ्यांसाठी सुरु केलेला मार्गदर्शन मेळावा आणखी काही दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान कागदपत्रे सादर केल्यास या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...