आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चू कडूंचा मोर्चा आता राज्यात:प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई महापालिका निवडणुकांसह 4 लोकसभेच्या जागा लढवणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण, कामगार राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आगामी महापालिका निवडणुकांसह राज्यात चार लोकसभेच्या तर 20 जागा विधानसभेच्या लढवणार आहेत. असे सुतोवाच त्यांनी अकोल्यात केले.

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मेळघाटमध्येही त्यांच्या पक्षाचा आमदार आहे. दोन आमदार असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपला मोर्चा आता राज्यात वळवला आहे. आमचा पक्ष राज्यात निवडणुका लढवणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात बोलताना सांगितले. बच्चू कडू हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्येही प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार ते उभे करणार आहेत.

त्याचबरोबरोबर अकोला महापालिका निवडणूका प्रहार लढणार आहे, अशी घोषणा प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी केली.यासोबतच मुंबई महापालिकेच्या 4 जागा, भुसावळ नगर पालिका आणि पुण्यातही निवडणूक लढवणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच निव्वळ जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच नव्हे तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत चार ते पाच जागा आणि 15 ते 20 विधानसभेच्या जागा प्रहार लढवणार आहे. महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असल्याने ते स्वतंत्र लढतात की आघाडीसोबत मैदानात उतरतात हे मात्र येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. अकोल्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच त्यांचा एक उमेदवार निवडूण आणला.

त्यानंतर जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला धूळ चारत त्यांनी सभापतीपदही मिळवले. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पालकमंत्री या नात्याने त्यांची ताकद ते आजमावणार असल्याने महापालिकेतही प्रहार खाते उघडल्यास नवल वाटू नये.

बातम्या आणखी आहेत...