आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण, कामगार राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे महापालिका निवडणुकांसह राज्यातील लोकसभेच्या ४, तर विधानसभेच्या २० जागा लढवणार आहेत, असे सूतोवाच त्यांनी अकोल्यात केले.
प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मेळघाटमध्येही त्यांच्या पक्षाचा आमदार आहे. दोन आमदार असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपला मोर्चा आता राज्यात वळवला आहे. आमचा पक्ष राज्यात निवडणुका लढवणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात बोलताना सांगितले. बच्चू कडू हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्येही प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार ते उभे करणार आहेत. त्याचबरोबर अकोला महापालिका निवडणुका प्रहार लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर, मुंबई महापालिकेच्या ४ जागा, भुसावळ नगरपालिका आणि पुण्यातही निवडणूक लढवणार असल्याचेही ते म्हणाले. केवळ जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच नव्हे, तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत चार ते पाच जागा आणि १५ ते २० विधानसभेच्या जागा प्रहार लढवेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.