आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांसारखे मोठेपण मोदी, पवारांमध्ये नाही:आंबेडकरांची टोलेबाजी; दादू इंदुरीकरांना मारलेल्या मिठीची आठवण सांगितली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेबांसारखे मोठेपण मोदी आणि पवारांमध्ये नाही. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा बाळासाहेबांमध्ये होता, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांना टोला लगावला आहे.

अकोल्यात झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 38व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

आपल्या भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, दादू इंदुरीकरांचे ‘गाढवाच लग्न’ या नाटकामध्ये इंदुरीकरांनी काही देवांची उडवली होती. तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आवाहन केले की तुमचे नाटक होवू देणार नाही. तेव्हा इंदुरीकर म्हणाले माझे नाटक बघायला या आणि ते मला बंद करून दाखवा. तेव्हा बाळसाहेब आले नाटकाला आणि त्या नाटकामध्ये इंदुरीकर असे म्हणाले की, आज माझ्यासोबत ढाण्या वाघ बसलेला आहे. त्यानंतर बाळसाहेब उठले आणि त्यांनी दादू इंदुरीकरांना मिठी मारली. हे वाक्य सगळ्या शोमध्ये झाले पाहिजे. हा माझा तुला असणारा अधिकार आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. हा दिलदारपणा मोदींमध्ये आहे का, शरद पवारांमध्ये आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

शिवाय, नाव न घेता त्यांनी रामदास आठवले यांच्यावर टीकास्त्र डागले. आंबेडकर म्हणाले की, आज काही महाभाग असे म्हणायला लागले की चुकून माकून बाबासाहेबांनी हा मार्ग घेतला. दुर्दैवाने जे जे विचारवंत अशा नेत्यांच्या पाठीमागे उभे राहतात, त्यांची आपल्याला कीव करावीशी वाटते. विचारपूर्वक चाललेल्या चळवळीला खीळ घालण्याचे काम ते करत आहेत. अशा विचारवंतांचा व त्यांच्या नेत्यांचा आणि मागणाऱ्यांचा आम्ही या जाहीर सभेत धिक्कार करतो.

आता म्हणतात ‘एकत्र बसू’

लोकसभेच्या निवडणुकांवेळी आम्ही भाजपकडे गेलो असा आरोप करणारे आता मात्र आपल्याला म्हणतात की आपण एकत्र बसू, असा टोला त्यांनी नाव न घेता काँग्रेसला लगावला. विचारस्वातंत्र्य राहिले पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...