आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:गवळी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण हुंडीवाले यांची निवड

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गवळी समाज संघटनेच्या युवक शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदावर येथील प्रवीण किसनराव हुंडीवाले यांची निवड करण्यात आली. गवळी समाज भूषण हंसराज अहिर यांनी त्यांचे स्वागत केले. पुसद येथे आयोजित एका कार्यक्रमात एकमताने ही निवड करण्यात आली. यावेळी हंसराज अहिर यांनी समाजाला मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमात एकमताने महाराष्ट्र प्रदेश युवक गवळी समाज अध्यक्ष प्रवीण किसनराव हुंडीवाले यांची एकमताने निवड करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये समाजाला संबोधताना हंसराज अहिर म्हणाले की, समाजाने नोकरीसाठी शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्यावा, राजकीय, आर्थिक दृष्ट्या मजबुतीकरण करण्यासाठी तालुका कार्यकारिणीला मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हिरामन गवळी प्रदेश सरचिटणीस अशोक मंडले, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशोक भाले, नारायणराव पुलाते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...