आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाच्या काळात प्रेमपत्रांचा ओलावा:राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात प्रेमपत्र संग्रहाने वेधले लक्ष

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. छंद हे माणसाला जीवन जगण्याचे मार्ग दाखवतात. 'हा छंद जीवा लागी पिसे' असं म्हणतात ते उगीचं नाही. कारंजा लाड जिल्हा वाशीम येथील गोपाल खाडे यांनी चक्क प्रेमपत्रांचा संग्रह केला. गोपाल खाडेंच्या 'प्रेमपत्रांच्या दुनियेत' ही भन्नाट प्रेमपत्र प्रदर्शनीचे विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात सर्वांचे लक्ष वेधत आहे.

500 प्रेमपत्रांचा समावेश

विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखा आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. स्व. बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड येथील संमेलनात विविध स्टॉलमध्ये प्रेमपत्रांचा संग्रह स्टॉल सर्वांच आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. गोपाल खाडे जि.प. विद्यालय कामरगांव ता. कारंजा लाड जि. वाशीम येथे शिक्षक आहे. विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा त्यांचा छंद आहे. त्यांच्याकडे गणपतीच्या शेकडो मूर्त्या व वीस हजार गणपती चित्रकात्रणाचा संग्रह आहे. तसेच विविध वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक यात आलेल्या प्रेमपत्रांचा भलामोठा संग्रह आहे.

पत्रसंसकृती टिकविण्याचा प्रयत्न

आजच्या धकाधकीच्या काळात पत्र मागे पडत गेली. ती इतकी की पत्रलेखन ही कला संपते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोपाल खाडेंनी विविध दैनिके, साप्ताहिके, मासीकांमध्ये आलेल्या बहुविध पध्दतींच्या शेकडो प्रेमपत्रांचे संकलन केले. यात प्रेयसी-प्रियकरांचीच नव्हे तर इतरही जवळच्या नात्यात मायेचा ओलावा, जिव्हाळा जपणार्‍या प्रेमपत्रांचेही संकलन आहे. व्हाट्स अप विद्यापिठाच्या युगात असली प्रदर्शनी म्हणजे अकोलेकरांसाठी एक पर्वणीचं आहे.

आनंदी, मार्मिक, भावूक करणारे पत्र

प्रेमपत्राच्या दुनियेत हया प्रदर्शनीचा आनंद घेतांना अप्रुप वाटल्याशिवाय राहत नाही. वेगवेगळ्या थाटणीचे, वेगवेगळे बाज वापरून लिहीलेली प्रेमपत्रांच सादरीकरण व मांडणी रसीकांना भुरळ पाडत आहे. आत्महत्या करू पाहणार्‍या भावास बहिणीने लिहलेले पत्र, आरोग्यक्षेत्रातील व्यक्तीने पत्नीस लिहलेले पत्र, मराठीसह वर्‍हाडी बोलीभाषेतील पत्र या संग्रहाची खास वैशिष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...