आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यान्वित:गणेश विर्सजनाची तयारी; निर्माल्य रथ शहरात गुरुवारपासून हाेणार कार्यान्वित

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्थी अर्थात शुक्रवारी ९ सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्याचा दिवस जवळ आला यंदाही उत्साहात निरोप देणार आहे. यासाठी तयार सुरू झाली. गुरुवारी ८ सप्टेंबर सकाळी ९ पासून निर्माल्य रथ कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यामुळे भागातील वेळेनुसार ‘श्रीं’च्या चरणी अपर्ण हार, फुले, दूर्वा, बेल,ी निर्माल्य रथात टाकून सहकार्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी सकाळी ९ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिरपासून रथ सुरु होईल. पुढे जठारपेठ येथील सौरभजी भगत यांची गल्ली, सुदर्शन देशपांडे, जकाते काका प्रसाद कॉलनी यांची गल्ली , रामदूत अपार्टमेंट, अहिर काका, मनमोहन जोशी यांची गल्ली, कावेरी अपार्टमेंट, शिवाभाऊ मोकलकर गल्ली सिद्धी विनायक मंदिर ज्योती नगर परिसर, विजू वाघ यांच्या दुकानाच्या बाजूची गल्ली, राजसरोवर अपार्टमेंट, एकदंत अपार्टमेंट, सातपुते, ओंकार अपार्टमेंट, नंतर तापडिया या नगरच्या ५ गल्ली व महाजणी प्लॉट गल्ली असा रथ प्रवास करेल.

दुपारनंतर निखिलेश दिवेकर यांची गल्ली, गोविंद अपार्टमेंट, अनिल कौसल यांचा वाडा, विजय वाघ यांची गल्ली, अँड. गणेश पाठक यांची गल्ली, राजू सोनी यांची गल्ली, राजसरोवर अपार्टमेंट, मनोज सोमण यांची गल्ली, पंकज लाहोळे गल्ली, शंकर नगर अँड. भरत देशपांडे यांच्या घराजवळील भाग, माधव देशमुख यांचे अपार्टमेंट, दिलीप देशपांडे यांचे वैभललक्ष्मी अपार्टमेंट, हरताळकर काकांची गल्ली, निखिल पांडेंची गल्ली येथे रथ येईल. सायंकाळी ४ वाजतानंतर गुप्ते रोड, न्यु गुप्ते रोड, ब्राह्मण सभा रोड, त्यानंतर ५.०० नंतर उत्तरा कॉलनी , सायंकाळी ६.०० नंतर न्यु तापडीया नगर, रात्री ८ वाजता नंतर गड्डम प्लॉट, रामदास पेठ, बिर्ला कॉलनी येथे निर्माल्य संकलन करण्यात येईल. दोन्ही दिवस म्हणजे ८ सप्टेंबर व ९ सप्टेंबर २०२२ याच मार्गाने निर्माल्य रथ कार्यान्वीत राहिल. या निर्माल्यातून खत तयार करण्यात येणार असल्याची माहिती नीलेश देव मित्र मंडळाने दिली आहे.

अनंत चतुर्थीसाठी सातव चौकात गणेश विसर्जन कुंड उभारणार
जठारपेठ, न्यू तापडीया नगर, ज्योती नगर, तापडीया नगर, उमरीचा काही भाग या ठिकाणच्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी सातव चौकात गणेश विसर्जन कुंड उपलब्ध राहणार आहे. अ‍ॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प तसेच नीलेश देव मित्र मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणच्या प्रभाग तीनमधील व इतर भाविकांना गणेश मूर्तीचे विर्सजन सुरक्षितपणे करता यावे, याची व्यवस्था केली आहे.

बातम्या आणखी आहेत...