आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभू श्रीराम प्रत्येक भारतीयांचे आराध्य आहे. श्रीराम नवनिर्मित्त अकोल्यात निघणारी शोभायात्रा रामभक्तीचे प्रकटीकरण करणारी असते. गत दोनवर्षे कोरोना आपत्तीमुळे शोभायात्रा निघू शकली नाही. सध्या कोरोना प्रादुर्भाव ओसरला असून, विश्व हिंदू परिषदेच्या संचालनात श्रीरामनवमी शोभायात्रेचे आयोजन केले आहे. प्रत्येक रामभक्ताने शोभायात्रेत सहभागी होऊन रामभक्तीचे विराट प्रकटीकरण करावे, असे आवाहन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
विश्व हिंदू परिषदद्वारा आयोजित श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या बैठकीत बोलत होते. ही शोभायात्रा श्रीराम नवमीला सायं. ५ वाजता मोठे राम मंदिरातून निघेल. यावेळी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष गजानन दाळू गुरुजी, अशोक गुप्ता, रा. स्व. संघाचे प्रा. नरेद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, विहिंपचे राहूल राठी, गणेश काळकर उपस्थित होते. अकोल्यात निघणाऱ्या श्रीरामनवमी शोभायात्रेने आता उत्सवाचे स्वरुप धारण केले आहे.
अकोल्यातील श्रीरामनवमी शोभायात्रेपासून अनेकांनी प्रेरणा घेऊन आपल्या गावांमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रा सुरू केली. गत ४० वर्षांपासून अखंडित निघणार्या शोभायात्रेला कोरोना काळात खंड पडला असला तरी पुन्हा त्याच उत्साहाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध देखावे, अश्व, श्रीराम दरबार रथ शोभायात्रेचे आकर्षण राहणार आहे. शोभायात्रेत शहरातील सर्व धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिक, माता भगिनींनी दरवर्षीप्रमाणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
यावेळी सुनील पसारी, संदीप वाणी, प्रकाश लोढीया, प्रकाश घोगलिया, सूरज भगेवार, डॉ. प्रवीण चव्हाण, विलास अनासने, डॉ. अभय जैन, रमेश कोठारी, अनिल थानवी, संजय दुबे, हरिओम पांडे, संतोष पांडे, अक्षय गंगाखेडकर, अजय नवघरे, रुपेश शहा, गजानन घोंगे, संदीप निकम, सुनील कोरडिया, बाळकृष्ण बिडवई, पुरूषोत्तम गुप्ता, गजानन रेलकर, मनीष बाछुका, नवीन गुप्ता, आशिष भिमजियानी, प्रताप विरवाणी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.