आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎‎शिवतेज प्रतिष्ठानतर्फे‎‎ महात्मा फुले जयंती:‎ याेगगुरू मनाेहरराव इंगळेंसह मान्यवरांची उपस्थिती

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ बहुजन समाजाला‎ समानतेचा मंत्र देणारे, वाईट प्रथांच्या‎ विरोधात ठाम उभे राहणारे,‎ स्रीशिक्षणाला घरातून सुरूवात‎ करणारे महात्मा जोतिबा फुले विपरीत‎ परिस्थितीत समाज सुधारणा करणारे‎ खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते,’ असे‎ प्रतिपादन योगगुरू मनोहरराव इंगळे‎ यांनी केले.‎ शिवतेज प्रतिष्ठानने नेहरूपार्क येथे‎ आयोजित महात्मा ज्योतीबा फुले‎ जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.‎ नि:शुल्क योग शिबीरात महात्मा‎ जोतीबा फुले यांचे पुतळ्यास‎ अभिवादन करून जयंती साजरी‎ करण्यात आली.‎ या कार्यक्रम यशस्वीते साठी‎ उपसंचालक डॅा. गोविंद जाधव,‎ वामनराव चौधरी, बाळासाहेब काळे,‎ मुकेश खंडेलवाल, अतूल‎ पळसपगार,शिवतेज इंगळे. तसेच‎ अनुराधा इंगळे, वंदना तायडे,अरूणा‎ धुमाळे, स्मिता केडीया, मोनिका‎ बालचंदाणी यांनी प्रयत्न केले.‎ शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता‎ करण्यात आली.‎