आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पोलिस असल्याची बतावणी‎ करून दागिने केले लंपास‎

मलकापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात व्यक्तीने पोलिस असल्याची बतावणी करीत दोन‎ दिवसांपासून चेकींग सुरू आहे असे सांगून सोन्याची‎ अंगठी व साखळी लंपास केल्याची घटना बुलडाणा‎ रस्त्यावर मंगळवारी सकाळी घडली.‎ आळंद येथील प्रकाश राजाराम खापोटे हे मंगळवारी‎ सकाळी लग्नाला हजेरी लावण्यासाठी शहरात आले‎ होते. त्या आधी ते कलासागर फोटो स्टुडिओ जवळच्या‎ दुकानात थांबले होते. बुलडाणा रस्त्यावर, उद्योजक‎ देवेंद्र पाटील यांच्या निवासस्थाना समोर सकाळी साडे‎ अकरा वाजेच्या सुमारास पोलिस वर्दीत असलेल्या एका‎ अज्ञात व्यक्तीने प्रकाश खापोटे यांना आवाज देवून‎ त्यांच्याशी संवाद साधत दोन दिवसांपासून पोलिसांची‎ चेकींग सुरू आहे.

त्यामुळे अंगावर सोन्याचे दागिने घालू‎ नका, रुपये पैसे सांभाळून ठेवा, असे म्हणत त्यांच्या‎ कडून सोन्याची अंगठी व रोख रक्कम काढून त्यांच्याच‎ रुमालात गुंडाळून ठेवली. त्यानंतर हा रुमाल त्यांना परत‎ दिला. असाच प्रकार आणखी एका व्यक्तीसोबत घडला‎ आहे. त्यानंतर तो तोतया पोलिस कर्मचारी चारचाकी‎ वाहनाने पसार झाला. त्यानंतर प्रकाश खापोटे यांनी‎ मित्राच्या दुकानात जावुन रुमाल उघडून पाहिला असता‎ त्यामध्ये १५ हजारांची रोकड व्यवस्थित होती. परंतु ३०‎ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी गायब‎ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.‎

बातम्या आणखी आहेत...