आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी डिसीज:अकोटमध्ये 7193 जनावरांना प्रतिबंधक लसीकरण; 274 गोंठे केली फवारणी

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी स्किन डिसीजचा प्रादूर्भाव जिल्ह्यातील विविध भागात वाढत असून सोमवारी, पशुसंवर्धन आयुक्त संचिन्द्र प्रताप सिंह यांनी अकोट तालुक्यात भेट देऊन आढावा घेतला. दरम्यान, तालुक्यातील 7193 जनावरांना प्रतिबंधक लसीकरण तसेच 274 गोंठे फवारणी केली असल्याची माहिती दिली.

जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव संदर्भात पशुसंवर्धन आयुक्त संचिन्द्र प्रताप सिंह यांनी रोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तांनी संबंधिताना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पी स्किन डिसीज संदर्भात आढावा बैठकी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त डॉ. जगदिश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, सहायक आयुक्त डॉ. तुषार बावणे, डॉ. राठोड आदि उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर पशुसंवर्धन आयुक्त यांनी अकोट तालुकातील लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालय येथे भेट देऊन तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज आजाराच्या उपायांचा आढावा घेतला. यावेळी अकोट तालुक्यातील 7193 जनावरांना प्रतिबंधक लसीकरण तसेच 274 गोंठे फवारणी केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर शिवपुर(कासोद) व जितापुर रुपागड या गावाला भेट देऊन पशुपालकांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले.

ही आहेत रोगाची लक्षणे

1. जनावराला मध्यम, काहीवेळा भयंकर ताप येणे.

2. जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते.

3. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते.

4. लसिकाग्रंथीना सूज येते.

5. जनावरांच्या शरीरावर 2 ते 5 सेमी व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात.

6. या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इ. भागात येतात.

7. गाठी कित्येक महिने शरीरावर टिकून राहतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर बऱ्याच कालावधीकरिता अथवा कायमच राहू शकतात.

8. तसेच तोंडात, घशात आणि श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ आणि फोड येऊ शकते.

9. तोंडातील पूरळामुळे जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळत असते.

10. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.

11. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

12. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधीत होते.

13. जनावरांना अशक्तपणा येतो आणि भूक मंदावते.

14. वजन कमी होते. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो.

15. प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बांधा पशूंमध्ये होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...