आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला:देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आणला : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आराेप

अकोला10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'भाजपाने देशाची अर्थव्यवस्था बिघडवली'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी पाहुण्यांवर बंदी घातली असती तर देशात कोरोना आलाच नसता. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशात हा व्हायरस आणला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारने लोकांना जगण्याची हिंमत देण्याऐवजी पूर्णपणे भयभीत केले असून, भाजपाने देशाची अर्थव्यवस्था बिघडवली असल्याचा आराेपही आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशातील कोरोनाची स्थिती ही कुटुंबात असून ती सामूहिक झाली नाही. आज देशातील १० हजार कोरोना मृत्यू झाले यावर अधिक चर्चा असून देशात १५ कोटी लोकांचा रोजगार गेला त्यावर कुणी काहीच बोलायला तयार नाही. बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडेे दुर्लक्ष करण्यासाठी कोरोनाला समोर करण्यात येत आहे. राज्यात आणि केंद्रात सुलतानशाही असल्याची टीका अ‍ॅड.आंबेडकर यांनी केली. दरम्यान, राज्यातील काँग्रेस व भाजपा हे दोन्ही सत्तेसाठी हपापलेले असल्याची टीका त्यांनी केली. देशात उत्पादन सुरु करण्यात येत आहे. पण, लॉकडाउन काळात देशात खरेदी करणारा खरेदीदार कुठे आहे असा प्रश्न अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. विकत घेणाऱ्या वर्गाच्या हातात पैसा आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीक कर्जाचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत कर्ज घेण्याची गरज वर्तवली. यासाठी ७९ हजार शेतकऱ्यांना ५५१ कोटी कर्ज वाटप करायचे आहे. शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडे अर्ज करावा त्यांनी कर्ज प्रक्रिया पुर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांना मदत करेल असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...