आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैदी फरार:किशोर खत्री हत्याकांडातील जन्मठेप भोगणारा कैदी फरार ; पोलिसांचा शोध सुरु

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी जसवंतसिंग उदयसिंग चव्हाण(जस्सी,) हा पॅरोलवर आला असता कारागृहात परत गेलाच नाही. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो दिसून येत नसल्याने अखेर पोलिसांनी त्याला फरार घोषित करून त्याचा शोध सुरु केला आहे. ३ डिसेंबर २०१५ रोजी किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शविारात रणजितसिंग चुंगडे व पोलिस कर्मचारी जस्सी याने गोळ्या घालून व शस्त्राने गळा चिरून हत्या केली होती. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, जसवंतसिंह व उर्फ जस्सी याच्याविरुद्ध कलम ३०२, १२० ब, २०१, आर्म अॅक्ट व ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी २७ सप्टेंबर २०१८ रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी जस्सी यास कलम १२० ब नुसार जन्मठेप, कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून कैदी जस्सी हा अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर यांच्या आदेशाने जस्सीला २१ दविसांच्या संचित रजेवर सोडले होते. ही रजा उपभोगून त्याने कारागृहात दाखल होणे गरजेचे होते. मात्र तो कारागृहात हजर झाला नाही. याबाबत त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून, त्याचा थांगपत्ता अद्याप पोलिसांना लागला नाही. या कैद्याविषयी माहिती मिळाल्यास जुने शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...