आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा; सकल ब्राह्मण समाजाचा पुढाकार

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त सकल ब्राह्मण समाजातर्फे २ मे रोजी मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाआरती करून शोभायात्रेचा प्रारंभ केला.

जुने शहर ब्राम्हण समाज बांधवांनी रेणुका नगर येथे एकत्रित येऊन रॅली काढली. ही रॅली डाबकी रोड, जुने शहर मार्गे भगवान श्री परशुराम चौक खोलेश्वर येथे झाली. नवीन शहरातील बंधू- भगिनींनी जिल्हा परिषद भवन येथे एकत्र येऊन रॅलीस प्रारंभ झाला. ही रॅली रतनलाल प्लॉट, श्रावगी प्लॉट, धिंग्रा चौक, पंचायत समिती मार्गे खोलेश्वर येथे झाली. या दोन्ही रॅलीमध्ये बहुभाषिक ब्राह्मण समाजातील महिला, पुरुष, तरूणांनी उत्साहात सहभाग नोंदवला. या वेळी सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते.

रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. याप्रसंगी कृष्णाजी शर्मा, रमेश अलकरी, राकेश शर्मा, निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, अश्विन पांडे, राजेश मिश्रा, अॅड. सत्यनारायण जोशी, पवन जोशी, गिरीशजी जोशी, अशोक शर्मा, नीलेश देव, सौ रश्मि कायदे, अक्षय गंगाखेड़कर, संदीप जोशी, अशोक शर्मा केलिवेळी, उमंग जोशी दीपक चौबे राधेश्याम शर्मा संजय जोशी, डॉ ,सुरेश सिवाल, विनय शर्मा, ओम जोशी, शशिकांत पांडे गुरुजी, विपुल पाठक, श्याम घाटे, अनुराग भाले, संजय जोशी, दीपक मायी, अक्षय जोशी अभिजित जोशी प्रा शिव चौबे,तुषार शर्मा अनंत शुक्ल, ओंकार शुक्ल, अरविंद शुक्ल सुरेंद्र अनिल जोशी,शुक्ल, हरिओम पांडे भारत दुबे, सूर्यप्रकाश शर्मा, रमेश वाजपेयी, पंडित दिलीप मिश्रा, संतोष पांडे, नितीन जोशी, आनंद शास्त्री, राधेश्याम शर्मा,लाला पंडित, सत्यनारायण शर्मा, विक्रम शर्मा, भूषण गुरुजी, अजय शर्मा (गोलू) राजू शर्मा, रतन रजत तिवारी, कुणाल जोशी, प्रमोद देशपांडे, गोपाल राजवैदय, बालु महाराज जोशी, श्याम कुळकर्णी, सौरभ शास्त्री, अथर्व कुलकर्णी, आदित्य पदवाड, ऋषिकेश दिवाकर, विजय शर्मा, चैतन्य तांबे, शिवम पाठक, सुशांत पाठक, श्रीकांत कुलकर्णी, सागर पाठक, अमित पाठक, रुपेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हे ठरले आकर्षण बँड पथक, श्री परशुराम यांचा देखावा, रामदरबार देखावा, भारतमाता देखावा, तसेंच उंट, घोडे सजवून शोभायात्रा उत्साहात सुरु झाली. दोन्ही रॅलीचा समारोप भगवान श्री परशुराम चौक येथे स्वागताने झाला. त्यानंतर भगवान परशुराम चौक येथे अखिल ब्राह्मण समाजातर्फे आमदार गोवर्धन शर्मा, विजय तिवारी, उदय महा, पं कालीशंकर अवस्थी, पं. ब्रजकिशोर दुबे, अमोल चिंचाळे, कुशल सेनाड, हितेश मेहता लता शर्मा, रश्मी कायंदे, भरत मिश्रा देवेंद्र तिवारी, राकेश शर्मा, संजय जोशी, यांचे हस्ते माल्यार्पण व पूजा करण्यात आली.

हे झाले सहभागी शोभायात्रेत राजस्थानी ब्राह्मण समाज, उत्तर भारतीय ब्राह्मण संघ, गुजराती ब्राह्मण समाज, मराठी ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय ब्राह्मण समाज यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या समारोपानंतर महाप्रसादाचे वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...