आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भीम जन्मोत्सवानिमित्त शिक्षण क्रांती‎ अभियानाअंतर्गत भीमगीतांचा कार्यक्रम‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय घटनेचे शिल्पकार,‎ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर‎ यांची जयंती शुक्रवारी १४ एप्रिलला‎ साजरी हाेणार असून, भीम‎ जन्मोत्सवा निमित्ताने शिक्षण क्रांती‎ अभियाना अंतर्गत भीमगीतांचा‎ कार्यक्रम हाेणार आहे. गायिका‎ भाग्यश्री इंगळे यांचा भीमगीतांचा‎ कार्यक्रम डाबकी राेडवरील डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर मैदानात‎ हाेणार आहे.‎ हा कार्यक्रम शनिवारी १५‎ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता‎ होणार असून, या कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी प्रा. अंजली‎ आंबेडकर राहणार आहेत. या वेळी‎ प्रमुख मार्गदर्शक म्हणून‎ आंबेडकरवादी मिशन नांदेडचे‎ प्रमुख दीपक कदम हे राहतील‎ कार्यक्रमाचे उद्घाटक तिक्ष्णगत‎ मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीचे‎ अध्यक्ष सुगत वाघमारे राहणार‎ आहेत.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष‎ लेखा व कोषागार विभाग‎ सहसंचालक औरंगाबाद विभाग‎ औरंगाबादचे उत्तम सोनकांबळे हे‎ असतील.‎ या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती‎ म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक‎ संदीप घुगे अकोला, निवासी‎ उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे,‎ ंिहगाेलीचे पाेलिस अधीक्षक जी‎ श्रीधर, प्रा. मुकूंद भारसाकळे आदी‎ उपस्थित राहणार असल्याची‎ माहिती भीम जन्मोत्सवाचे‎ आयोजक किरण सिरसाट यांनी‎ दिली, अशी माहिती कळवण्यात‎ आली आहे.‎