आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Prohibition On Production, Distribution Of POP Idols, Collector's Orders; Implementation Of Pollution Control Board Instructions | Marathi News

बंदी:पीओपीच्या मूर्तींचे उत्पादन, वितरण करण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; प्रदूषण मंडळाच्या सूचनांची अंमलबजावणी

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदूषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियमामधील तरतुदीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचे उत्पादन, वितरण व विक्रीस शुक्रवार ,१ मे २०२२ पासून प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जारी केला.

पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम १९८६ मधील तरतुदीनुसार आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार होण्याच्या दृष्टीने निर्गमित केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी सन २०२२ च्या गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दर सोमवारी सादर करावा लागणार प्रगती अहवाल ः आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावा, यासाठी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठान किंवा व्यक्तींवर दंडात्मक व कडक कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्त व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी विशेष पथक मोबाईल भरारी पथकाची स्थापना करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. गठीत पथकांमध्ये सेव्ह बर्ड संस्थेच्या प्रतिनिधींचाही समावेश करावा. आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रगती अहवाल दर सोमवारी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करावा. तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षकांनी फिरते भरारी पथकासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करावी, असे आदेशात म्हटले आहे.

यंदाचा गणेशोत्सव ‘पीओपी फ्री’
आगामी गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्तीची विक्री करणाऱ्या तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. पीओपीच्या मूर्ती बनवण्यास शुक्रवार १ मे २०२२ पासून प्रतिबंध करण्यात येत आहे. यानंतर पीओपीच्या मुर्ती आढळून आल्यास मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

काय आहे आदेशात?
प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) मूर्ती निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
मूर्तिकारांकडे पीओपीच्या मूर्ती असल्यास त्यांना ३० एप्रिल २०२२ पर्यंत विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...