आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती:अव्वल कारकुनांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती द्या

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदाेन्नती देण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेकडून आंदाेलनास प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. यासाठी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

गत अनेक वर्षांपासून अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली आहे. अनेक कर्मचारी पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या महसूल कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने २१ नोव्हेंबरला उपायुक्तांना (महसूल) निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावा, ही प्रमुख मागणी केली.

टप्प्याटप्प्याने आंदोलन ५ डिसेंबरला निदर्शने करण्यात येणार आहेत. ९ डिसेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयापुढे पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदाेलन. १३ डिसेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयापुढे पदाधिकाऱ्यांचे उपोषण. २१ डिसेंबरला एक दिवसांचे लेखणी बंद आंदोलन. जिल्ह्यात २३ डिसेंबरला १ दिवसाचा लाक्षणिक संप व २६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...