आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर थकल्याने महापालिकेने खदान परिसरातील काही नागरिकांची मालमत्ता सील केली अाहे. काही िदवसांपासून कर वसुलीसाठी महापालिकेने माेहीम सुरू केली आहे. मनपा दक्षिण क्षेत्रातील शास्त्री नगर, खदान येथील वाॅर्ड क्रं. डी-४ मालमत्ता क्रं. २४९८ त्रिपाठी यांच्याकडे २०१६-१७ ते २०२२-२३ चे थकित व चालू मालमत्ता कर ८४,८०६ असून, त्यांची मालमत्ता सील केली.
पश्चिम झोन अंतर्गत खैर मोहम्मद प्लॉट येथील वाॅर्ड क्रं. बी-१० मालमत्ता क्रं.१७१४ शईदाबी यासीन भोगवटादार खुशी कलेक्शन यांच्याकडे २०१६-१७ ते २०२२-२३ चे थकित व चालू मालमत्ता कर १,६०,४५९ अाहे. त्यांच्या ४ दुकांनाना सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून सील, जप्ती व लिलाव सारख्या अप्रिय कारवाई टाळावी अाणि मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.