आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:थकीत मालमत्ता कराचा भरणा न‎ केल्याने मालमत्तेला केले सील‎

अकाेला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत मालमत्ता‎ कराचा भरणा न केल्याने‎ महापालिका मालमत्ता कर विभागाने‎ दक्षिण झोन मधील एका मालमत्तेला‎ सिल लावले. दरम्यान थकीत‎ कराचा भरणा नागरिकांनी करावा,‎ असे आवाहन प्रशासनाने केले‎ आहे.‎ महापालिकेसमोर कोट्यवधी‎ थकीत कर वसुलीचे आव्हान उभे‎ ठाकले आहे. यासाठीच थकीत‎ कराचा भरणा न करणाऱ्या‎ मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला‎ सिल लावण्याची कारवाई मोठ्या‎ प्रमाणात सुरु आहे.

दक्षिण क्षेत्रातील‎ आदर्श कॉलोनी येथील वार्ड क्रं.‎ डी-३ मालमत्‍ता क्रं. २५१६‎ माणिकराव गावंडे धारक‎‎‎‎‎‎‎‎‎ सौ.विजयाताई गावंडे यांचे कडे सन‎ २०१७-१८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा‎ ११ लाख ८८ हजार ५७२ रुपयाचा‎ मालमत्ता कर थकीत होता. थकीत‎ मालम्तता कराचा भरणा‎ करण्याबाबत वारंवार सुचना‎ करुनही थकीत मालमत्ता कराचा‎ भरणा न केल्याने अखेर त्यांच्या‎ मालमत्तेला सिल लावण्यात आले.‎ ही कारवाई आयुक्‍त तथा प्रशासक‎‎‎‎‎‎‎‎‎ कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये‎ आणि कर अधिक्षक विजय‎ पारतवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली‎ क्षेत्रीय अधिकारी देविदास‎ निकाळजे, सहा. कर अधिक्षक‎ प्रशांत बोळे, जप्ती पथक प्रमुख‎ विजय बडोणे, लिपिक राजेश‎ दवंडकर, संतोष खाडे, महेंद्र‎ लंगोटे, सुरक्षा रक्षक बाली इंगळे व‎ सौरभ सदाफुले आदींनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...