आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर वसुली:अकोला मनपाकडून 82 कोटींचा रुपयाचा मालमत्ता कर वसुल; 121 कोटी रुपयाचा मालमत्ता कर थकीत

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने 2022-2023 या आर्थिक वर्षात 82 कोटी रुपयाचा मालमत्ता कर वसुल केला आहे. महापालिकेला अद्याप 121 कोटी रुपयाचा थकीत कर वसुलीचे आव्हान पेलावे लागणार आहे. या थकीत कराची वसुली महापालिका किती टक्के करणार? यावर महसुल अवलंबून आहे.

महापालिकेला 2022-2023 या आर्थिक वर्षात 122 कोटी 43 लाख रुपयाचा थकीत तर 79 कोटी 64 लाख रुपयाचा चालु असा एकुण 202 कोटी 8 लाख रुपयाचा मालमत्ता कर वसुलीचे आव्हान होते. थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारले जाते.

या व्याजाचा भूर्दुंड सर्व सामान्य नागरिकांना बसु नये,यासाठी प्रशासनाने अनेकदा अभय योजना राबवली. मात्र तरीही थकीत कराची वसुली मोठ्या प्रमाणात झाली नाही. संपूर्ण वर्षात थकीत मालमत्ता करापैकी 41 कोटी रुपये तर चालु वर्षातील 41 कोटी रुपये असा एकुण 82 कोटी रुपयाचा मालमत्ता कर वसुल करता आला. त्यामुळे महापालिकेला चालु आर्थिक वर्षात थकीत कराच्या वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे.

121 कोटींचा मालमत्ता कर थकीत

मागील आर्थिक वर्षात 122 कोटी थकीत करापैकी केवळ 41 कोटी रुपयाच्या कराची वसुली झाली तर 79 कोटी चालु करापैकी 41 कोटी रुपयाची वसुली झाली. त्यामुळे 2023-2024 या आर्थिक वर्षात महापालिकेला 121 कोटी थकीत आणि 80 कोटी चालू आर्थिक वर्षातील कर असा एकूण 201 कोटी रुपयाच्या मालमत्ता कराची वसुली करावी लागणार आहे.