आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्ग:क्षयरोग रुग्णांना कोविडचा संसर्ग होण्यापासून वाचवा

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोनाचे संकट नियंत्रणात असले तरी अशा काळात दमा, अस्थमा आणि जुनाट क्षयरोग असलेल्या रुग्णांना कोविडची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ देतात.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका १६ वर्षीय युवतीचा कोविड उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला.या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवतीला क्षयरोग होता. त्यामुळे क्षयरोग असलेल्या नागरिकांची कोविड संकटाच्या काळात विशेष काळजी घ्यावी,

फुफ्फुसाची क्षमता कमी
क्षय रोगामुळे आधीच फुफ्फुसाची क्षमता कमी झालेली असते त्यामुळे क्षयरोग असणाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी अधिक जपावे लागते. साधारणपणे सुरुवातीला क्षयरोग हा फुफ्फुसाच्या वरच्या भागात होतो तर कोविड हा फुफ्फुसाच्या खालच्या भागात होतो. डॉ. गोपाल सोळंके, छातीरोग तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...