आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या खासदार भावना गवळी यांच्याविराेधात केलेल्या घाेषणाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकाऱ्यांची लाेहमार्ग पोलिस अकाेलाकडून चाैकशी करण्यात आली. संबंधितांचे जबाब नाेंदविण्यात आले.
अकोला रेल्वे स्थानक येथे खा. भावना गवळी या 22 नोव्हेंबर रोजी मुबंईकडे जाण्यासाठी आल्या हाेत्या. त्याच वेळी काही शिवसैनिक अकाेला दाैऱ्यावर असलेल्या खासदार विनायक राऊत यांना साेडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले हाेते. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अकाेला पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, दिलीप बाेचे, युवा सेनेचे राहुल कराळे, आदींचा उपस्थित हाेते.
खा. गवळी यांच्याकडे पाहत शिवसैनिकांनी घाेषणा दिल्या. 'गद्दार' अशा आषयाची नारीबाजी करण्यात आली. उपराेक्त प्रकारानंतर खासदार गवळी यांनी अकोला लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
दाेन्ही बाजूने वार-पलटवार
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या 26 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला हाेता. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत या बंडखाेरीविराेधात राेष आहे. दाेन्ही बाजूने एकमेकांवर आराेप-प्रत्याराेप सुरू असतात. रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेचा शिंदे गटाकडूनही रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला हाेता.
यांनी घेतली धाव
गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिस स्टेशनकडून शिवसैनिकांना तपासासाठी उपस्थित राहण्याकरिता समन्य बाजवण्यात आले हाेते. त्यानुसार रविवारी जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, पूर्वचे अध्यक्ष अतुल पवानकीर, युवा सेनेचे नेते राहुल कराळे , उपजिल्हाप्रमुख दिलीप बाेचे, प्रदीप गुरूगुद्दे, गजानन बाेराेळेा साेनू भरकर, सचिव चावरे, राम गावंडे, प्रकाश वानखडे आदींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
अशी झाली चाैकशी
शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेबाबत विचारणा करण्यात आली. घटनेच्या दिवशी व्हीडीओ क्लिपमध्ये दिसणारे अन्य इसम काेण आहेत, यासह अन्य बाबींबाबत प्रश्न िवचाण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.