आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक बियाणींच्या हत्येचा अकोट येथे निषेध, मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड येथील बिल्डर व बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा अकोट येथील मारवाडी समाज बांधवांनी तीव्र निषेध करून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. अकोट तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मारवाडी समाज बांधवानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका व्यावसायिकाची खंडणीसाठी हत्या होणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. या घटनेचा अकोट मारवाडी समाज तीव्र निषेध करतो. स्व. बियाणींच्या मारेकऱ्यांना अटक करून त्याना कठोर शासन करण्यात यावे. सोबतच राज्यातील सर्व व्यावसायिकांना अशा खंडणीखोरांपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

अकोट उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत हे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र येन्नावार यांना देण्यात आले. निवेनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री अकोला यांना पाठवण्यात आल्या आहेत.

निवेदन देतेवेळी नवनीत लखोटिया, प्रमोद चांडक, लुनकरण डागा, सुरेश टावरी, सुनिल मालाणी, दिनेश भूतडा, डॉ. राजेंद्र हेडा, डॉ. शाम केला, देवानंद कलंत्री, धीरज चांडक, मनोज भंडारी, अजय राठी, महेश चांडक, सचिन भंडारी, किशोर लखोटिया, अमर केला, अॅड. तरुण कोठारी, जितेश मंत्री, गोपाल राठी, सारंग मालाणी, उमेश लोहिया, अमित गट्टाणी, संतोष भूतडा, प्रतिक चांडक, ईश्वर हरकंठ, प्रकाश राठी, सुनिल चांडक, नारायण राठी, वृषगोपाल डागा, वासुदेव कासट, भगिरथ राठी, हरिष टावरी, सचिन हरकंठ, कृष्णा भूतडा, कमलकिशोर मालाणी, नटवरलाल चांडक, निलेश राठी, सचिन राठी, ओमप्रकाश राठी, सुनिल सोमाणी, अशोक गट्टाणी, अतुल मालाणी, ललित राठी,अमर राठी आदी समाज बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...